Goa BJP Core Committee Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: विधानसभेत पक्षाची शोभा होऊ देऊ नका! भाजप कमिटी बैठकीत सूर

Goa BJP Core Committee: राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर विधेयके आणताना पक्षाला विश्‍वासात घ्यायला हवे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजप कोअर कमिटीच्या शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत विधानसभा अधिवेशनात पक्षाच्या कामाविषयी चर्चा झाली. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर विधेयके आणताना पक्षाला विश्‍वासात घ्यायला हवे. विरोधी पक्षांनी विधेयकातील त्रुटी दाखविल्याने आणि एक विधेयक मागे घ्यावे लागल्याने त्याचे या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. पक्षाची शोभा व्हायला नको, असेही मत मांडण्यात आले.

पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस खास करून गोवा प्रभारी आशिष सूद उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार नीलेश काब्राल, माजी आमदार बाबू कवळेकर, दामू नाईक, दत्ता खोलकर आणि विनय तेंडुलकर उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशनाचे काही दिवस उरले आहेत. त्यात विरोधी पक्षाच्या आमदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला बॅकफूटवर यावे लागले आहे. विधेयक मागे घ्यावे लागणे, शिवाय दुरुस्त्या स्वीकाराव्या लागणे ही कारणे विचार करायला लावणारी आहेत. त्यामुळे विधेयक आणताना पक्षाशी चर्चा करावी, अशा सूचना काही नेत्यांनी मांडल्या.

भाजप भवनची पायाभरणी

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे २३ रोजी गोव्यात येत आहेत. भाजप भवनचा पायाभरणी सोहळा व्यापक स्वरूपात केला जाणार आहे. पक्ष बांधणीसाठी ज्यांनी योगदान दिले आहे, अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरिता खास निमंत्रित केले जाणार असल्याचे तानावडे यांनी नमूद केले.

११ पासून राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहीम!

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने देशभर सुरू केलेला ‘हर घर तिरंगा’ यात्रा हा कार्यक्रम राज्यात राबविण्यावर आणि तो यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कार्यक्रम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची दोन पथके नेमली आहेत. ता. ११ ते १५ पर्यंत प्रभात फेरी, स्मारकांची साफसफाई, दुचाकी रॅली, मशाल मिरवणूक असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी घरांवर राष्ट्रध्वज लावावेत, असे सूचित केल्याची माहिती तानावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT