Goa Latest Crime News Canva
गोवा

Goa Crime: ...तर 'त्यांचा' जीव वाचला असता! पारोडा खून प्रकरण; परप्रांतीय आरोपीची कोणतीही 'पडताळणी' झाली नसल्याचे उघड

Paroda Murder Case: पैशासाठी पारोडा येथील उबाल्‍दिना ब्रागांझा या महिलेचा भर दिवसा खून केला होता. या प्रकरणी एका कामगाराला केपे पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र या परप्रांतीय कामगाराची कोणीही पडताळणी केली नव्‍हती.

गोमन्तक डिजिटल टीम

Paroda Murder Case

मडगाव: पैशासाठी पारोडा येथील उबाल्‍दिना ब्रागांझा या महिलेचा भर दिवसा खून केला होता. या प्रकरणी एका कामगाराला केपे पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र या परप्रांतीय कामगाराची कोणीही पडताळणी केली नव्‍हती. या कामगाराची पडताळणी केली असती, तर तो पोलिसांच्‍या नजरेखाली राहिला असता आणि तसे झाले असते तर बिचाऱ्या उबाल्‍दिनाचा जीवही वाचला असता.

२९ नोव्‍हेंबर रोजी उबाल्‍दिनाच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. युकेत काम करणाऱ्या पण आपल्‍या घराची डागडुजी करण्‍यासाठी पारोडा येथे आलेल्‍या उबाल्‍दिना हिचा २१ नोव्‍हेंबर रोजी खून झाला.

तिच्‍या घराचे काम करणाऱ्या राजकुमार रावत या मूळ मध्‍यप्रदेशातील कामगाराने तिचा खून केला होता. ‘माँ जी तुम आती हो’, असे फोनवरून विचारून, ती आल्‍यानंतर संशयित राजकुमार रावत याने उबाल्‍दीना ब्रागांझा हिचा खून करून तिच्‍याकडील ५० हजार रोकड व एक सोनसाखळी लंपास केली होती. पैशांच्या हव्‍यासांतूनच पूर्वनियोजीतपणे त्‍याने तिचा काटा काढल्‍यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. मूळ गावी मध्‍यप्रदेशला गेला. पोलिसांनी तेथे जाऊन त्‍याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या होत्‍या.

सदर कामगार पारोड्याला एका घरात भाड्याने रहात होता आणि तो अधूनमधून गोव्‍यात ये-जा करत होता, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. या कामगाराला ज्‍या कंत्राटदाराने कामाला लावले त्‍यानेही त्‍याची अधिकृतरीत्या पडताळणी केली नव्‍हती किंवा ज्‍या महिलेने त्‍याला आपल्‍या घरात भाड्याने ठेवले होते, त्‍या घरमालकिणीनेही त्‍याची पडताळणी केली नव्हती.

निरीक्षक अर्जुन सांगोडकर म्हणाले, कामगाराची पडताळणी झालेली नव्‍हती, ही गोष्‍ट खरी असून त्‍या संदर्भात आम्‍ही लवकरच जिल्‍हाधिकाऱ्यांना आमचा अहवाल सादर करू असे सांगितले.

पडताळणी आवश्‍यक!

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेल्‍या गोवा वूमन्‍स फोरमच्‍या निमंत्रक लॉर्ना फर्नांडिस म्हणाल्या, परप्रांतीय कामगारांसंदर्भात विशेष खबरदारी घेणे आवश्‍‍यक आहे. परराज्‍यांत गुन्‍हेगारी स्वरूपाच्या कृत्‍यात भाग घेतलेले संशयित गोव्‍यात आसरा घेतात. अशा कामगारांकडून लोकांच्‍या जिवाला धोका असल्‍याने त्‍यांची पडताळणी करणे अत्‍यंत गरजेचे आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT