Parlor owner granted anticipatory bail in goa Dainik Gomantak
गोवा

‘त्या’ पार्लरच्या चालकाचा अटकपूर्व जामीन मंजूर

म्हापशातील प्रकार: मारहाण, लुबाडणुकीची घटना

दैनिक गोमन्तक

म्हापसा: चंदगड-महाराष्ट्रातील अकरा युवक पर्यटकांच्या गटास म्हापशातील एका कथित पार्लरमध्ये मारहाण करून, त्यांची लुबाडणूक करण्यात आली होती. या प्रकरणातील, त्या कथित पार्लरची चालक सरीना डिकुन्हा हिचा अटकपूर्व जामीन म्हापसा येथील फास्ट ट्रक न्यायालयाने मंजूर केला.

(Parlor owner granted anticipatory bail in goa)

या प्रकरणात स्वतःची अटक टाळण्यासाठी पार्लर चालक डिकुन्हा यांनी अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयात केला होता. या सुनावणीनंतर 50 हजारांची बॉण्ड व तितक्याच रक्कमेचा हमीदाराच्या हमीनुसार हा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी मंजूर केला.

अर्जदाराने चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच आरोपपत्र सादर होईपर्यंत चौकशीसाठी बोलविले असता पोलिस स्थानकात हजेरी लावावी इत्यादी अटी न्यायालयाने जामिनाला दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT