Mumbai-Goa Highway Work  Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट रोज 6 तासांसाठी राहणार बंद

परशुराम घाट विभाग 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान दररोज सहा तास बंद राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai-Goa Highway Work : मुंबई-गोवा महामार्ग हा आपल्या देशातील रखडलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. मागील अनेक वर्षांपासून याचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, चिपळूण, रत्नागिरी येथील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट विभाग 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान दररोज सहा तास बंद राहणार आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 6 या कालावधीत हा विभाग बंद राहणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी हे केले जात आहे. या काळात वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहे.

परशुराम घाट विभागाची लांबी सुमारे 5.40 किमी आहे. आतापर्यंत 4.20 किमी महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, परशुराम घाटाच्या उर्वरित 1.20 किमी लांबीचे काम अजून अपूर्णच आहे. डोंगराळ भागामुळे त्या भागाचे काम थोडे आव्हानात्मक आहे.

काही वेळा या भागात अवकाळी पावसात भूस्खलनाच्या घटना घडतात. रस्त्याच्या कामात डोंगराच्या 25 मीटरपर्यंत खोदकाम केले जाईल. खोदकाम सुरू असताना महामार्गावर दगड आणि माती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. महामार्गाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राज्य PWD-राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महामार्ग बंद करण्यासाठी ठेकेदाराने अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT