Paper Mill Company assures Honda Panchayat Mandal to 'reduce pollution' Dainik Gomantak
गोवा

'प्रदुषण कमी करणार' पेपर मील कंपनीचे होंडा पंचायत मंडळाला आश्वासन

होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या पेपर मील कंपनीमुळे प्रदुषण होत असल्याची लेखी तक्रार भुईपाल येथिल एका स्थानिकांनी होंडा पंचायत कडे केली होती

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या पेपर मील कंपनीमुळे प्रदुषण होत असल्याची लेखी तक्रार भुईपाल येथिल एका स्थानिकांनी होंडा पंचायत कडे केल्याची दखल घेऊन आज होंडा पंचायतीने आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन कंपनीच्या परीसराला भेट दिली, यावेळी कंपनी व्यवस्थापनाने एक महीन्यात प्रदुषण कमी करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भुईपाल येथिल पंच सया पावणे यांनी दिली आहे.

सदर कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेतून उग्र स्वरूपाचा वास तसेच कंपनीच्या आवारातून सांड पाणी बाहेर सोडले जात असल्याची तक्रार महानंद कोलप्टे यांनी होंडा पंचायती कडे दिली होती, त्याची दखल घेऊन पंचायतीतर्फे कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती, त्या प्रमाणे आज होंडा पंचायतीचे शिष्टमंडळाने कंपनीच्या परीसराला भेट देऊन पाहणी केली, यावेळी सांखळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी केलेल्या पाहाणीत कंपनीने बाहेर सांड पाणी सोडलेले आढळून आले नाही, मात्र काही दिवसांपूर्वी कंपनीच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात काही तांत्रिक बिघाडामुळे काही प्रमाणात पाणी बाहेर गेले होते परंतू सदर प्रकार लक्षात येताच ते पाणी लगेच बंद करण्यात आले होते असे कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य केले असल्याचे पंच सया पावणे यांनी सांगितलेआहे.

यावेळी झालेल्या चर्चेत कंपनी तर्फे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी खबरदारी घेऊन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाय योजना आखणार असल्याचे सांगितले आहे त्याच प्रमाणे यापुढे सांड पाणी बाहेर सोडले जाणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी हमी देखील यावेळी पंचायत शिष्टमंडळाला दिली, त्याच प्रमाणे किती स्थानिकांना रोजगार दिला आहे याविषयी चर्चा करताना कंपनीने आतापर्यंत एकूण 45 जणांना रोजगार दिला असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या संबंधी कंपनीच्या सभा कक्षात झालेल्या बैठकीत कंपनीच्या वतीने संचालक जगदीश पटेल व इतर संचालक उपस्थित होते, तर पंचायत मंडळाच्या वतीने सरपंच आत्मा गावकर, उपसरपंच शशिकला राणे, पंच सया पावणे, पांडुरंग गावकर, लिना गावडे, प्रतिक्षा गावडे, निधी गावकर, पुर्णाली केरीकर, तर तक्रार दाखल केलेले महानंद कोलप्टे हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT