Goa Police  Dainik Gomantak
गोवा

सेवेमध्ये निष्काळजीपणा भोवला, पणजीत पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

नोंद केलेल्या 29 गुन्ह्यांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल न केल्याप्रकरणी कारवाई

दैनिक गोमन्तक

पणजी : सेवेमध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल गोवा पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यावर त्याच्या कार्यकाळात गुन्ह्यांचं आरोपपत्र योग्य वेळेत न्यायालयात सादर न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी आदेश जारी केला आहे.

पणजीचे पोलीस (Police) उपनिरीक्षक उत्क्रांतराव देसाई यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. आपल्या सेवेत निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देसाई यांनी त्यांच्या कार्यकाळात नोंद केलेल्या 29 गुन्ह्यांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. गोव्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार आदेश (Order) जारी करण्यात आला आहे.

दरम्यान होळीच्या (Holi) दिवशी शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कोडार - बेतोडा येथे बाचाबाचीच्या प्रकरणातून पोलिसांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संशयित पोलिस कॉन्स्टेबल रामा खाणेकर आणि ओंकार मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांनाही सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT