Panjim police arrest accused  Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case : सरकारी नोकरीचे आमिष; 2.12 कोटी रुपयांना गंडा

दोघे गजाआड : पणजी पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

आयएएस अधिकाऱ्याचा पीए आणि चालक असल्याचे सांगत एका तारांकित हॉटेलसाठी भाडेपट्टीवर कंत्राट देण्याचे आमिष दाखवून 10.55 लाखांची फसवणूक करणाऱ्या डिचोलीतील समीर धावस्कर आणि दिनकर सावंत यांना पणजी पोलिसांनी आज शिताफीने अटक केली.

संशयित समीर याने काही युवकांना सरकारी नोकरी देण्याची आश्‍वासने देत सुमारे 2 कोटी 12 लाखांनाही गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

समीर आणि दिनकर यांनी उसगाव येथील मुकेश नाईक याला पणजीतील तारांकित हॉटेलसाठी कंत्राटी पद्धतीवर वाहन लावून देतो, असे सांगून त्याच्याकडून 10.55 लाख रुपये घेतले होते.

मात्र, अनेक दिवस वाहनाचे कंत्राट न देताच ते दोघे गायब झाले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मयूर पणशीकर, हवालदार नितीन गावकर, इर्मिया गुर्रैय्या, आदित्य म्हार्दोळकर व रामा घाडी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

सावज सापळ्यात

मुकेश याच्या तक्रारीची चौकशी करताना अनेकांनी पणजी पोलिसांत समीरबद्दलही तक्रारी दिल्या. स्वत:ला आयएएस अधिकाऱ्याचा चालक असल्याचे सांगून सरकारी नोकऱ्या देतो, अशी थाप मारत समीरने तब्बल 2.12 कोटी रुपये लुबाडल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून डिचोली परिसरातून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT