Goa Panjim Municipality Dainik Gomantak
गोवा

Panjim Feast : पणजी महापालिकेला लॉटरी; फेस्तासाठी जमा झाला तब्बल 19 लाखांचा महसूल

पणजीतील फेरीसाठी परराज्यातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

गोमन्तक डिजिटल टीम

मेरी इमॅक्युलेट चर्चची फेस्त फेरी 14 ते 18 डिसेंबर रोजी फेरी भरणार आहे. या फेरीत दुकानासाठी सोमवारी महापालिकेने 380 अर्जांची विक्री केली. या प्रक्रियेतून महापालिकेला यंदा 19 लाख 76 लाखांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती लेखा व कर अधिकारी सिद्धेश नाईक यांनी दिली.

फेरीसाठी परराज्यातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्याचाच फायदा उठवून गणेशोत्सवाच्या फेरीच्या अर्जांचा जो काळाबाजार झाला, त्यातून पणजी महापालिकेची बदनामी झाली होती. त्यातून महापालिकेने धडा घेत यावेळी नियमावली करीत स्थानिक व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी स्थानिक ओळखपत्र म्हणून आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आले होते. आज दोनशे रुपये प्रमाणे 380 अर्ज देण्यात आले. त्याशिवाय पाच दिवसांचे पाच हजार रुपये भाडे अशा प्रकारे प्रत्येक व्यावसायिकाकडून 5,200 रुपये आकारण्यात आले. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत 19 लाख 76 हजार रुपये जमा झाले आहेत, असे नाईक म्हणाले.

नाताळ आणि वर्षाअखेरीचा महिना असल्याने या महिन्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्याचा फायदाही या फेरीवाल्यांना होत असतो. त्यासाठी या फेरीसाठी दुकाने मिळविण्यासाठी विविध तालुक्यातील स्थानिक व्यावसायिक प्रयत्नशील असतात. गणेशोत्सवाच्या फेरीवेळी अर्जांसाठी नगरसेवकांच्या नातेवाईकांनी जो घोळ घातला होता, तो आजही अधिकाऱ्यांना आठवतो.

प्रवेशद्वारावर गर्दी!

अर्ज विक्री होणार असल्याने महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त मागविला होता. मोजकेच आणि प्रथम आलेल्यास प्राधान्य, अशा अटीवर अर्ज विक्री झाल्याने थोडाफार गोंधळ उडाला. अर्ज न मिळालेल्यांनी प्रवेशद्वारावर गर्दी केली, परंतु पोलिस त्याठिकाणी असल्याने व्यावसायिकांनी काढता पाय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT