Kala Academy
Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: पंचवाडीचे ‘शी! कांवळो आपुडला’ प्रथम

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy कला अकादमीतर्फे आयोजित 47 व्या कोकणी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून एकदंत कला संघ पंचवाडी-फोंडा या संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘शी! कांवळो आपुडला ... या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आणि 1 लाख रूपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.

यासोबतच या नाटकाला उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आदी विभागात देखील प्रथम पारितोषिके पटकावत सर्वार्थाने नाटकाने बाजी मारली आहे.

द्वितीय पारितोषिक युवा एकवट भोमा-फोंडा यांचे ‘लिअरान जगचें काय मरचें’, तृतीय अंत्रुज घुडयो, बांदोडे फोंडा संस्थेच्या ‘हिडिंबा’ नाटकास मिळाले. उत्तेजनार्थ श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज बंदिवडे फोंडा यांच्या ‘कुत्रे’ व रसरंग उगवे यांच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ यांना प्राप्त झाले आहे.

10 फेब्रुवारी ते 13 मार्च या दरम्यान राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे संपन्न झाली होती. एकूण 22 नाटके सादर करण्यात होती. या नाट्यस्पर्धेचे परीक्षण देविदास आमोणकर, नीता देसाई आणि शिवनाथ नाईक यांनी केले.

उत्कृष्ट अभिनय

उत्कृष्ट अभिनयासाठी साई कलंगुटकर (पुरूष गट) तर हर्षला पाटील बोरकर (स्त्रीगट) यांना प्राप्त झाले.

द्वितीय अभिषेक नाईक, शेफाली नाईक यांना प्राप्त झाले तर प्रमाणपत्रे अनुक्रमे कुणाल बोरकर, प्रसन्न कामत, सचिन चौगुले, केदार मेस्त्री, गौतम दामले, प्रेमानंद गुरव, राजेंद्र च्यारी, संतोष नाईक, सिद्धेश मगनलाल. स्त्री गटात दक्षिता मांद्रेकर, नेहा गुडे, सेजल दिवकर, साईशा शिरोडकर, रेश्‍मा नाईक, समृद्धी वायंगणकर, सरिता माशेलकर, प्रणता काणकोणकर, तनश्री राणे, मानसी केरकर यांना प्राप्त झाली.

उत्कृष्ट दिग्दर्शक- दीपराज सातोर्डेकर

उत्कृष्ट दिग्दर्शक क्षेणीत प्रथम पारितोषिक `शी ! कांवळो आपुडला` या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी दीपराज सातोर्डेकर यांना प्राप्त झाले तर द्वितीय वैभव नाईक यांना लिअरान ‘जगचें काय मरचें’ च्या दिग्दर्शनासाठी तर तृतीय `हिंडिंबा` या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी अनंत बांबोळकर यांना प्राप्त झाले.

इतर पारितोषिके : उत्कृष्ट नेपथ्य्यासाठी दीपक सातोर्डेकर, प्रमाणपत्र - मोहित विश्‍वकर्मा, वेशभूषेसाठी अनिकेत नाईक, प्रियंका गावस, प्रकाश योजनेसाठी विशाल गावकर, वैभव नाईक, रंगभूषा खुशबू कवळेकर, एकनाथ नाईक, पार्श्‍वसंगीत चेतन खेडेकर, तानाजी गावडे, यांना प्राप्त झाले आहे.

कोकणी नाट्यपरंपरेत नवी संकल्पना, विषय आणण्याचा माझा सदोदित प्रयत्न असतो. प्रस्तुत नाटक हे मासिक पाळीवर आधारित असून तीन पिढीतील स्त्रियांमधील हा संघर्ष आहे. पहिली स्त्री ही परंपरा मानणारी, दुसरी जी शिक्षित आहे आणि सर्व गोष्टी तथ्य तपासणारी व तिसरी ही लहान मुलगी जी संभ्रमावस्थेत आहे, की कुणाचे अनुकरण करू.

प्रस्तुत नाटक मी स्त्रीवादाच्या अनुषंगाने लिहिले नाही, माझी भूमिका ही तटस्थतेची आहे. प्रामुख्याने ही तीन पिढ्यांमधील संघर्षाची कहाणी आहे. मी ज्या गावात पंचवाडी येथे राहतो, तो परिसर नाटकासाठी तसा पोषक नाही. नाट्यदिग्दर्शक आणि लेखक म्हणून पहिल्यांदा पारितोषिके प्राप्त झाली. मला पात्रनिवडीसाठी अधिक कष्ट घ्यावे लागले.

- दीपराज सातोर्डेकर, नाट्यलेखक, दिग्दर्शक.

हे नाटक माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचे नाटक आहे. मी जे विल्पव पात्र साकारले. पात्रावर काम करताना मला आवाजाच्या आणि शारीरिक अभिनयावर अधिक काम करावे लागले. कारण हे पात्र 55 वर्षीय व्यक्तीचे होते. मला विश्‍वास होता, की अभिनयासाठी पारितोषिक प्राप्त होईल. कारण मी खूप मेहनत केली होती.

- साई कलंगुटकर, अभिनेता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT