CAG Dainik Gomantak
गोवा

Goa: पंचायत कार्यालय भाडेपट्टीत मोठा भ्रष्‍टाचार; मंत्र्यांच्‍या नावाचा उल्लेख

‘कॅग’ने याबाबत अहवाल सादर केला आहे.

दैनिक गोमन्तक

ईडीसी पाटो येथील ‘माईल्स हाय’मध्ये पंचायत कार्यालयाचे स्थलांतर केल्यानंतर भरमसाट भाडेपट्टी देण्यात येत असल्याने सुमारे 2.95 कोटीचे सरकारी तिजोरीला नुकसान झाल्याचा शेरा ‘कॅग’च्‍या अहवालात मारण्यात आला आहे.

त्याचा संदर्भ घेत या प्रकरणाच्‍या चौकशीची मागणी दक्षता खात्याकडे तक्रार दाखल करून करण्यात आली आहे. या तक्रारीत पंचायतमंत्री व संचालकांचा उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दिली.

जुन्ता हाऊस इमारतीमधील पंचायत कार्यालय ‘माईल्स हाय’ या इमारतीत स्थलांतर करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी भाडे रक्कम मासिक 1.89 लाख रुपये निश्‍चित केली होती. मात्र पंचायत कार्यालयाने निश्‍चित केलेल्या भाडेपट्टीला बगल देत मासिक 9.44 लाख रुपये व जीएसटी अशी रक्कम ठरविली.

‘कॅग’ने सादर केलेल्या अहवालात त्याचा उल्लेख केला होता व सरकारने केलेल्या या अफाट खर्चाबाबत शेराही मारला होता. या अहवालाच्या आधारे सरकारी तिजोरीच्‍या झालेल्या नुकसानीला मंत्री व संचालकांना जबाबदार धरून त्यांच्याकडून ते वसूल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

Goa Assembly Election 2027: अटी, शर्ती आणि उमेदवारीचा कट! पार्सेकर अधांतरी, बाबूशना बळ; भाजपच्या रणनीतीत पणजी, मांद्रे, म्हापसा केंद्रस्थानी

Horoscope 10 July 2026: आज नशिबाची शंभर टक्के साथ! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती करणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT