Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुका जूनमध्येच होणार : मॉविन गुदिन्हो

पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण मसुदा अधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण मसुदा अधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणुका 4 जून रोजी घेण्याऐवजी आठवडाभर पुढे जाऊ शकतील, मात्र जून महिन्यातच पंचायत निवडणुका होणार असल्याची माहिती पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली आहे. गोव्यातील पंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची चर्चा सध्या सुरु होती, मात्र आता गुदिन्हो यांच्या वक्तव्यानंतर यावर पूर्णविराम लागला आहे.

पंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात सादर केलेला मसुदा सरकारने तत्त्वतः मान्य केला आहे. मात्र, अद्याप अनेक कामे बाकी आहेत. त्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडण्याचे संकेत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी यापूर्वीच दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्याभरात प्रभाग रचना आणि आरक्षण मसुदा अधिसूचित केला जाईल. त्यांनतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात होईल.

यापूर्वी गोव्यात पंचायत निवडणुका 4 मे ला घ्याव्यात असे ठरले होते. तशी तारीख आम्ही सरकारला पाठवली होती. यावर अद्याप सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. राज्यातील 186 पंचायतींची मुदत 15 जूनच्या दरम्यान संपत आहे. त्यामुळे तत्पूर्वी निवडणुका होणे गरजेचे आहे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून यासाठीच काही प्रभागांची पुनर्रचना आणि आरक्षणासंबंधीचा मसुदा राज्य सरकारकडे पाठवला आहे.

नागरिकांकडून सूचना दुरुस्त्या मागवल्या होत्या. त्यानुसार सुमारे 970 सूचना आणि दुरुस्त्या आल्या होत्या. यातील योग्य सूचना लक्षात घेऊन आणि दुरुस्त्या करून त्या राज्य सरकारला पाठविण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून या नव्या बदलांना मान्यता मिळाली असून या आठवड्याभरात यापुढची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT