Panchayat Election in Goa Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकीसाठी महिला, एससी, एसटी आरक्षण अधिसूचित

निवडणूक आयोगाकडून तयारीला वेग; 11 पंचायतींवर प्रशासक नियुक्त

दैनिक गोमन्तक

पणजी : जाहीर झालेल्या पंचायती निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर वेग आला असून राज्य निवडणूक आयोग आपले कामकाज गतिमान केले आहे. आयोगाने काल शुक्रवारी महिला, एससी आणि एसटी यांच्यासाठीचे पंचायत प्रभाग आरक्षण अधिसूचित केले अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. तर सरकारने उर्वरित 11 पंचायतींवर आज प्रशासक नेमल्याची घोषणा केली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचायत संचलनालयाने राज्यातल्या 186 पंचायतींच्या निवडणुकांची गुरुवारी घोषणा केली. 10 ऑगस्टला मतदान तर असून 12 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरच्या तयारीला वेग आला असून राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजाने वेग घेतला आहे. राज्यातील या निवडणुकांकरिता निवडणूक आयोगाने महिला, एससी आणि एसटीसाठीच्या प्रभाग पंचायत प्रभाग आरक्षित करून ते अधिसूचित केले .

लोकसंख्येवर आधारित आरक्षण
राज्य निवडणूक आयोगाने आज प्रत्येक प्रभागातील अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांची लोकसंख्या लक्षात घेऊन 186 पंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी प्रभागांचे आरक्षण अधिसूचित केले. सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केलेल्या तिहेरी चाचणीचे पालन केल्यानंतर इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

11 पंचायतींवर प्रशासक नेमले
सरकारने उर्वरित 11 पंचायतींसाठी प्रशासक म्हणून सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या 11 पंचायतींची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. 19 जून रोजी मुदत संपलेल्या 186 पंचायतींपैकी 175 पंचायतींवर सरकारने यापूर्वीच प्रशासक नियुक्त केले आहेत .राज्यातील 186 पंचायतींच्या निवडणुका 10 ऑगस्ट रोजी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT