Panchayat Election  Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकीसाठी तब्बल 6,256 उमेदवारांचे अर्ज

27 जुलैला अर्ज मागे घेण्याचा दिवस; आज होणार अर्जांची छाननी

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील 186 पंचायतींच्या 1528 प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता राज्यभरातून 6 हजार 256 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची मंगळवारी छाननी होणार असून बुधवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. काल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यातल्या सहा ठिकाणी केवळ एकच उमेदवारी अर्ज झाल्याने हे सर्व सहा जण बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. त्यांची घोषणा अर्ज माघारी घेतल्यानंतरच होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील 186 पंचायतींच्या निवडणुका 10 ऑगस्ट रोजी होणार असून 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे यासाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली असून आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी विक्रमी 1499 उमेदवारी अर्ज आले. आज 26 जुलै रोजी या अर्जाची छाननी होणार असून 27 जुलैला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतरच राज्यातल्या पंचायत निवडणुका संदर्भातला चित्र स्पष्ट होणार आहे.

आतापर्यंत या पंचायतींच्या निवडणुकीकरिता 6,256 उमेदवारी अर्ज आले असून याबाबतची अद्यावत माहिती सर्व 12 ही तालुक्याच्या मामलेदारकडून आली आहे. या निवडणुका पक्षीय पातळीवर होणार नसून त्या स्थानिक आघाड्यांच्या पातळीवर होत आहेत यासाठी एसटी, एससी, ओबीसी आणि महिलांसाठी आरक्षण लागू केले आहे.

सर्वाधिक उमेदवारी अर्ज बार्देशमधून

पंचायत निवडणुकांकरिता सर्वाधिक उमेदवारी अर्ज बार्देश तालुक्यातून 1263 आले आहेत. तर धारबांदोडा तालुक्यातून सर्वात कमी 173 अर्ज दाखल झाले आहेत. तर पेडणे मधून 515, डिचोलीमधून 488, सत्तरीतून 355, तिसवाडीतून 691, फोंडा येथून 733, सांगेतून 211 , सासष्टीमधून 994, मुरगाव येथून 282, केपे येथून 311 तर काणकोण येथून 241 उमेदवारी अर्ज आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT