Fuel leak In Goa Dainik Gomantak
गोवा

Fuel Leak In Goa: पंचांची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

Fuel Leak In Goa: इंधन गळती : जुवारी इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स विरोधात न्यायालयात जाणार

दैनिक गोमन्तक

Fuel Leak In Goa: महिना संपत आला तरी दाबोळी, चिखली, व्हडलेभाट परिसरातील विहिरी, नाल्यात पेट्रोल-डिझेल मिश्र इंधन साठा मिळत आहे. जुवारी इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स कंपनी व मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समिती व्हडलेभाट परिसरातील भूमिगत वाहिनीतील इंधन गळतीवर अजूनही योग्य प्रकारे नियंत्रण न आणल्याने, अखेर चिखलीच्या पंच नीलम नाईक यांनी कंपनी विरुद्ध पंतप्रधान कार्यालयात व केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे.

तसेच सोमवारी (दि.२०) कंपनीविरोधात न्यायालयात जनहित याचिका सादर करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे. चिखली, व्हडलेभाट परिसरात एक महिना संपत आला तरी मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती व जुवारी इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स लिमिटेडच्या अधिकारी भूमिगत वाहिनीतून पाझरत असलेल्या इंधनावर नियंत्रण ठेवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे पंच नीलम नाईक यांनी सांगितले.

येथील विहिरीत व नाल्यातील इंधन मिश्र साठ्याचा अहवाल अजून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य जलस्रोत विभागाने जाहीर केलेला नाही. अजूनही व्हडलेभाट परिसरात इंधनाचा वास येत आहे. पेट्रोल डिझेल मिश्र इंधनाच्या वास येथील रहिवाशांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते, असे नाईक यांनी सांगितले.

पंतप्रधान कार्यालयाबरोबर पेट्रोलियम मंत्रालयात रीतसर तक्रार सादर केली आहे. यापुढे दाबोळी, चिखली, व्हडलेभाट परिसरातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य न्याय देतील, असे पंच नाईक यांनी सांगितले. तसेच कंपनी विरोधात सोमवारी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पंच नाईक यांनी सांगितले.

विहिरीतून काढले 150 टँकर इंधन!

साकवाळ येथील जुवारी इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स व मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समिती दाबोळी, चिखली, व्हडलेभाट परिसरातील रहिवाशांचा आरोग्याचा कधीच गंभीरतेने विचार केला नाही. यामुळे अजूनही इंधन साठा आढळत आहे. ज्येष्ठ नागरिक ज्योकिम फर्नांडिस यांच्या विहिरीतून आतापर्यंत १५० टँकर इंधन काढले आहे.

आल्तो दाबोळी भूमिगत इंधन गळती लागलेले ठिकाण सापडले तरी इंधनाचा साठा व्हडलेभाट परिसरात आढळत असल्याने नाईक यांनी संशय व्यक्त केला. संबंधित विभाग व कंपनी इंधन गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपयशी ठरल्याने न्याय मिळण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात दाद मागावी लागली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT