St Inez Road  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: 'तो' रस्ता होणार कधी? सांतिनेजमधील अर्धवट कामामुळे वाहतुकीची कोंडी

St Inez Road Issue: रस्ता रुंदीकरणासाठी येथील बांधकाम हटवावे लागणार आहे, त्यासाठी बांधकामधारकाची उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली आहे आणि त्याचा निकाल अद्यापी बाकी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

St Inez Road Widening Problem

पणजी: सांतिनेजमधील वेलनेस औषधालयासमोरील वाय आकाराच्या (तिकाटणे) रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न वाहनधारकांना सतत पडत असावा. शीतल हॉटेलजवळील एका तावेर्नधारकाने केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले, ते अजूनही रखडलेलेच आहे.

त्यामुळे ते काम कधी पूर्ण होणार याबाबत इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे सीईओ संजीत रॉड्रिग्स यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून त्यावर स्पष्टीकरण मिळू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता रुंदीकरणासाठी येथील बांधकाम हटवावे लागणार आहे, त्यासाठी बांधकामधारकाची उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली आहे आणि त्याचा निकाल अद्यापी बाकी आहे, तर दुसरीकडे ‘आयपीएससीडीएल’ या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत कामाला पुढे नेऊ शकणार नाही. याशिवाय अतिक्रमण करणाऱ्या दुकानमालकाने अतिक्रमण हटविण्याची हमीही उपजिल्हाधिकाऱ्यांना दिली असली तरी ती जागा ताब्यात घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

उदय मडकईकर, नगरसेवक

स्मार्ट सिटीची कामे हाती घेतल्यानंतर आणि वेलनेस औषधालयासमोरील बांधकामे रस्त्यात अडथळे ठरणार असल्याची संबंधित यंत्रणेला माहिती होती. ज्या पद्धतीने त्या बांधकामाशेजारील सरकारी इमारतीची संरक्षक भिंत हटवून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे, ते पाहता अडथळा ठरणाऱ्या जागेचा विषय सोडविण्याचे काम सर्वात पहिल्यांदा होणे अपेक्षित होते. रस्ता रुंद झाल्यास नक्कीच येथील वाहतूक अजून सुरळीत होईल.

प्रमेय माईणकर, नगरसेवक

वेलनेस औषधालयासमोरील काम मलिनिस्सारण वाहिनीच्या कामामुळे अडल्याचे सांगण्यात येत होते, त्याशिवाय त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातही सुनावणी सुरू असल्याचे आपण ऐकले आहे. परंतु त्यातील सत्य काही असले तरी हे काम बराचकाळ रखडल्याने स्मार्ट सिटीच्या कामांविषयी येथील नागरिकांना प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. स्मार्ट सिटीचे काम करणाऱ्या यंत्रणेने नियोजनपूर्वक पावले उचलणे आवश्यक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT