Goa Traffic Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: पणजी, पर्वरीत वाहतूक खोळंबण्‍याचे प्रकार वाढले; पर्यटकांचीही मोठी गर्दी

वाहतुकीची ही समस्‍या दूर करण्‍यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे

गोमन्तक डिजिटल टीम

राजधानी पणजी आणि पुंडलिकनगर-पर्वरी ते चाररस्ता जंक्शन यादरम्‍यानच्‍या रस्त्यावरची वाहतूक सातत्याने खोळंबण्याचे प्रकार होत आहे. प्रजासत्ताकदिन वीकेंड साजरा करण्‍यासाठी मोठ्या संख्‍येने आलेल्‍या देशी पर्यटकांमुळे काल शनिवारी आणि आज रविवारी या दोन्‍ही ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्‍यामुळे लोकांना मन:स्‍ताप सहन करावा लागला.

कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र व ओरिसा या राज्यातील अनेक पर्यटक आपली वाहने घेऊन वीकेंड एन्जॉय करण्यासाठी गोव्यात आलेले आहेत. राजधानी पणजीलाही ते आवर्जुन भेट देतात. त्‍यातच काही ठिकाणी या रस्त्याच्‍या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दोन महिने झाले तरी हे काम पूर्ण झाले नसल्‍याने वाहनचालकांसाठी हा मोठा डोकेदुखीचा विषय बनला आहे.

सुरवातीस बाजूचा पट्टा मातीचा असला तरी वापरण्याजोगा होता, परंतु आता त्या जागी खडी टाकल्याने त्या पट्ट्यावर वाहने पंक्‍चर होण्याच्या भीतीने चालक रस्त्याच्या मधून वाहने हाकतात. तसेच काही बेशिस्त पर्यटक वाहतुकीचे सर्व नियम धाब्‍यावरल बसवून वाहने हाकतात. परिणामी वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. वाहतुकीची ही समस्‍या दूर करण्‍यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT