Amit Naik Bail Granted Dainik Gomantak
गोवा

Amit Naik: "मला बळीचा बकरा केला आहे" म्हणणाऱ्या अमित नाईकला कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

Amit Naik Bail Granted: न्यायालयाच्या निर्णयानुसार बडतर्फ आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक सशर्त जामीन मंजूर झाला आहे

Akshata Chhatre

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलेमान खान याला कोठडीतून पसार होण्यास मदत केलेल्या बडतर्फ आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती आणि त्यानुसार या विषयावर सुनावणीचा शनिवारी (२१ डिसेंबर) निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पणजीतील न्यायालयाच्या निर्णयानुसार बडतर्फ आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक सशर्त जामीन मंजूर झाला आहे.

संशयित अमित याने पोलिस कोठडीत असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला त्याची मनोरुग्ण तपासणीसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले व या तपासणीत त्याचे मानसिक आरोग्य ठीक असल्याचे आढळल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी दिली होती.

त्याची कोठडीतील चौकशी करण्याची पोलिसांना संधी मिळाली नसल्याचे सांगत जुने गोवे पोलिसांनी त्याच्या जामिनाला विरोध केला होता.

अमित नाईक याने जामिनासाठी केलेल्या अर्जात पोलिसांनी मला खोट्या प्रकरणात अडकवले आहे व बळीचा बकरा केला आहे, असा दावा केला होता. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे व सध्या मी न्यायालयीन कोठडीत असल्याने चौकशीची त्यांना गरज नाही. मी गोव्याचा रहिवासी असून वास्को येथे माझे घर आहे, त्यामुळे मी फरार होण्याची शक्यता नाही. पोलिस चौकशीसाठी बोलावतील तेव्हा माझी हजर राहण्याची तयारी आहे. माझी पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची नाही. त्यामुळे जामीन द्यावा, अशी विनंती त्याने अर्जात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गुरुवारी 'या' राशींचे नशीब उजळणार! धनलाभ, पदोन्नती आणि यशाच्या नव्या संधी; वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

आरटीआयचा ऐतिहासिक विजय! 33 वर्षांनंतर कांदोळी ग्रामपंचायतीने हुडकून काढल्या 'त्या' नोंदी

Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

Viral Video: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत घाणेरडा प्रकार; खाली उभ्या असणाऱ्या तरुणाने केले अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल!

Goa Government Schools: शाळा वाढल्या पण बाकडी रिकामी! 6 वर्षांत 49 सरकारी शाळा बंद, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८ ने वाढ!

SCROLL FOR NEXT