Panaji traffic congestion angers motorists (Edited)Restore original Dainik Gomantak
गोवा

पणजीत वाहतूक कोंडी, वाहन चालक संतप्त

बेशिस्त पार्किंगमुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत

दैनिक गोमन्तक

राज्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी वाढत आहे. अनेक ठिकाणी पर्यटकांसोबत स्थानिक ही वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत. राज्याच्या राजधानीत बेशिस्त पार्किंगमुळे पणजीतील 18 जून मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वाहन चालकांत संताप पाहायला मिळाला. वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. वाहतूक विभागाकडून अनेक ठोस पावले उचलली गेली आहेत. मात्र तरीदेखील वाहतूक प्रश्न सुटताना दिसत नाही. बेशिस्त पार्किंगमुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत.

दरम्यान, बेशिस्त पार्किंगमुळे वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती मिळताच पणजी (panaji) पोलिसांनी (police) घटनास्थळी जाऊन वाहतूक कोंडी सोडवली. मात्र यानंतर देखील काही काळ वाहतूक कोंडी आढळून आली.

दरम्यान, गावातील अंतर्गत रस्त्याने नियमबाह्य खनिज वाहतूक नकोच. या भूमिकेशी मयेवासीय ठाम राहिल्याने डिचोलीच्या (Bicholim) उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत खनिज वाहतुकीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नसल्याने बैठक निष्फळ ठरली आहे.

मयेतील अंतर्गत रस्त्यावरून बेकायदा खनिज वाहतूक सुरू झाल्यास ती रोखून धरण्यात येईल. पोलिस बळाचा वापर करून खनिज वाहतूक (traffic) सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास तोही हाणून पाडण्यात येईल, असा इशारा मयेवासीयांनी दिला आहे. त्यामुळे मयेतील खनिज वाहतुकीसमोरील संकट कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT