Artificial Intelligence  Dainik Gomantak
गोवा

Artificial Intelligence : ‘एआय’ वापरामुळे शैक्षणिक क्षेत्रात होईल मोठे परिवर्तन : भूषण सावईकर

Artificial Intelligence : सहा दिवसीय कार्यशाळेचा उत्साहात समारोप

गोमन्तक डिजिटल टीम

Artificial Intelligence :

पणजी, एआय तंत्रज्ञान हे परिवर्तनशील तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात विषय म्हणून केल्यास शैक्षणिक क्षेत्रासह अध्यापन प्रक्रियेतही सकारात्मक परिवर्तन घडून त्याचेायदे मिळतील,  असे प्रतिपादन उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी केले.

ते उच्च शिक्षण  संचालनालय आणि गोवा उच्च शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्वरी येथील एससीईआरटी इमारतीत आयोजित केलेल्या समारोपसत्रात ते

बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. सुरेश नंबूथिरी, कार्यशाळेच्या मुख्य समन्वयक प्रा. डॉ. कविता असनानी आदी मान्यवर उपस्थित होते. पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या समारोपाचे प्रास्ताविक कार्यशाळेच्या मुख्य समन्वयक प्रा. कविता असनानी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.वंदना सावंत यांनी केले.

विविध शाखांमधील विषयांवर मार्गदर्शन

दि. १०जून ते १५ जून या सहा दिवसांत  विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, व्यावहारिक विज्ञान, आरोग्य विज्ञान, सामाजिक विज्ञान, भाषा, कायदा आणि मानव्यशास्त्र आदी विषयांच्या अनुषंगाने एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो या वर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय उपस्थितांना हँडबुकही देण्यात आले.

डॉ. कविता असनानी म्हणाल्या...

एआय तंत्रज्ञान हे उच्च शिक्षणातील अध्यापन प्रक्रियेत बदल घडवून आणणारे प्रभावी साधन ठरू शकते.

शिक्षकांना एआय तज्ज्ञ बनविणे हा कार्यशाळेचा उद्देश नसून त्यांना अध्यापनात अधिक कार्यक्षम आणि कुशल बनविणे हा आहे.

एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अध्यापन प्रक्रियेतील मूल्ये अधिक विकसित करता येतील.

डॉ. सुरेश नंबूथिरी यांचे अमूल्य मार्गदर्शन

सहा दिवसीय कार्यशाळेत अध्यापन प्रक्रियेत एआय तंत्रज्ञानाचा वापर, एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाठ्यनियोजनाचा आराखडा, विद्यार्थ्यांसमोर नाविन्यपूर्ण सादरीकरण याबद्दलचे अमूल्य मार्गदर्शन एस्पायर टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि प्रख्यात एआय तज्ज्ञ डॉ. सुरेश नंबूथिरी यांनी केले.  या कार्यशाळेला प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT