Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: हे तर हिमनगाचे टोक! 'स्मार्ट सिटी' घोटाळ्यावरून भाजप सरकारला काँग्रेसने घेरले

Yuri Alemao: या घोटाळ्याची सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधीशांद्वारे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी आलेमाव यांनी केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City Scam

पणजी: कथित कोट्यवधी रुपयांच्या पणजी स्मार्ट सिटी घोटाळ्यात पहिला एफआयआर दाखल झाल्याने अखेर मांजर पोत्याबाहेर असल्याची उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. त्याचबरोबर या घोटाळ्याची सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधीशांद्वारे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी यांच्या विरोधात एफआयआर नोंदविल्यानंतर आलेमाव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आलेमाव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, एफआयआर हे हिमनगाचे फक्त टोक आहे. काँग्रेस वेळोवेळी हेच सांगत आला आहे. तक्रार दाखल झाल्याने त्यावरून स्मार्ट सिटी प्रकल्प हा एक मोठा घोटाळा आहे, हे स्पष्ट होते.

एफआयआरमध्ये ६७ लाख रुपयांची आर्थिक अनियमितता असल्याचे म्हटले आहे, परंतु आम्हाला माहीत आहे की, ही रक्कम कितीतरी अधिक आहे. या कोट्यवधींच्या घोटाळ्यात इतर अनेकजण सहभागी असल्याचा आरोप आलेमाव यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करणारी एसीबी सत्ताधारी भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे निष्पक्ष चौकशी करू शकत नाही, असा आरोप करीत आलेमाव पुढे म्हणतात, ज्यामध्ये सर्व माजी अध्यक्ष आणि आयपीएससीडीएल बोर्डाच्या इतर सदस्यांच्या भूमिकेकडेही लक्ष दिले जाईल.

वैयक्तिक विकास?

आम्ही जेव्हा जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा भाजप सरकारने स्मार्ट सिटीच्या कामात घोटाळा झाल्याचे मान्य करण्यास नकार दिला. आता त्यांच्याकडे काय उत्तर आहे? ते काय कारवाई करणार? असा सवाल आलेमाव यांनी केला आहे. भाजपचे विकासाचे मॉडेल ते हेच आहे काय? आम्ही नेहमीच म्हणत आलो, की हा गोवा आणि गोव्याचा विकास नाही, तर भाजप पक्षाच्या नेत्यांचा हा वैयक्तिक विकास आहे, हे आता यावरून दिसून येत असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT