Smart City  Dainik Gomantak
गोवा

Smart City : कामगारांना तुच्छतेची वागणूक; प्रसंगी शिव्या, मारहाणीचा सामना

Smart City : पणजी शहरात ठिकठिकाणी मलनिःसारणासाठीच्या चेंबरसाठी खड्डे खणणे, त्यात चेंबर बांधणे, गटारे खोदणे, ती बांधणे, त्यावर लाद्या बसविणे, डांबरीकरण करणे आदी कामे हे मजूर करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City :

पणजी, ‘ये साला तुम घाटी लोग... इधर क्या कर रहे हो?? आपको इधर किसने भेजा, बंद करो ये काम, वरना मार खाओगे’ रणरणत्या उन्हात अशा शब्दांचा भडिमार सहन करून पणजी ‘स्मार्ट’ करण्यासाठी विविध राज्यांतून आलेल्या कामगारांना काम करावे लागत आहे.

या कामगारांना स्थानिकांकडून मिळणारी ही वागणूक माणुसकीला काळिमा फासणारी अशीच आहे.

पणजीतील ‘स्मार्ट सिटी’चे काम मुख्य पाच कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आले आहे. या कंत्राटदार कंपन्यांकडून ५० उपकंत्राटदारांना हे काम वाटून देण्यात आले आहे. या उपकंत्राटदारांनी गोव्यात मजूर मिळत नसल्याने देशातील विविध भागांतून एक हजाराहून अधिक मजूर आणले आहेत आणि हेच हजारो मजूर पणजी ‘स्मार्ट’ करण्याच्या कामात हातभार लावत आहेत. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, मध्यप्रदेश, कर्नाटक येथील मजुरांचा समावेश आहे. आपल्या कुटुंबापासून हजारो मैल दूर आलेल्या या कामगारांना मात्र आपुलकीची वागणूक देण्याऐवजी तुच्छतेची वागणूक दिली जात आहे.

पणजी शहरात ठिकठिकाणी मलनिःसारणासाठीच्या चेंबरसाठी खड्डे खणणे, त्यात चेंबर बांधणे, गटारे खोदणे, ती बांधणे, त्यावर लाद्या बसविणे, डांबरीकरण करणे आदी कामे हे मजूर करत आहेत.

कामगारांवर ओढवलेली आपबीती

१ गटारे खोदताना किंवा चेंबरसाठी खड्डा खोदताना एखाद्या घरमालकाच्या पाणीपुरवठ्याच्या जोडणीला धक्का बसला, तर ते तावातावाने येऊन आमच्या अंगावर धावून येतात. पाण्याची जोडणी आम्ही दुरुस्त करून देतो, असे सांगितले तरी ते ऐकण्याच्या मनःस्थिती नसतात, आम्हाला काठीने मारहाण करून तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात.

२ नंतर कंत्राटदाराने त्यांना समजावून सांगितल्यानंतर ते शांत होतात व आमचे काम पुढे सुरू होते, असे अनेक दिवस, अनेक ठिकाणी, जिवावर बेतणाऱ्या प्रसंगांना तोंड देत आम्हाला काम करावे लागत आहे, अशी व्यथा आज काही कामगारांची भेट घेतली असता त्यांनी मांडली.

३ अनेकदा काम पूर्ण झाल्यानंतर ते चकाचक झालेले पाहून काहीजण आमचे कौतुकही करतात, हे आम्ही समजू शकतो. परंतु सुरवातीला काम करू नका म्हणून मारहाणीची धमकी देणारे नंतर काम पूर्ण झाल्यानंतर खूश होतात, असा अजब प्रकारही आम्हाला पाहायला मिळाला, असे एका कामगाराने सांगितले.

एक दिवस दुपारी २.३० वाजता चार - पाच जणांचा एक गट खूप दारू ढोसून काम करत असलेल्या ठिकाणी आला. आम्ही चेंबरसाठी खोदलेला खड्डा ते आत्ताच्या आत्ता बुजवा म्हणून आमच्यावर दादागिरी करत होते.

आम्ही त्यांना चेंबर बांधून झाल्यावर तो खड्डा बुजवणार म्हणून सांगत होतो, आधी खड्डा बुजवा, मग चेंबर बांधा अशी विचित्र भाषा बोलून आमच्यावर दादागिरी करत होते. काम बंद करा नाही, तर तुम्हाला मारतो अशी धमकी देत त्यांनी आम्हा चार - पाच कामगारांच्या कानसुलातही लगावली. अशा स्थितीत आम्ही काम कसे करावे?

- एक कामगार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT