Kadamba EV Bus Shed  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: 'स्मार्ट' बससेवा हीच का? पणजीत 'शेड'ची उभारणी अजून नाहीच

Kadamba Transport EV Buses: कदंब महामंडळाला स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ईव्ही बसेस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काही कालावधीतच त्या सेवेत आणल्या आहेत. पणजीत ईव्ही बससेवा सुरू झाली आहे. लोकांचा हळूहळू या सेवेकडे कल वाढत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Smart City Panaji Kadamba EV Bus Shed

पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कदंब परिवहन महामंडळाने पणजी शहरात ईव्ही बससेवा सुरू केली. या सेवेला हळूहळू लोकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे, ही जमेची बाजू आहे हे निश्चित; परंतु सेवा सुरू होऊन काही आठवडे होत आले तरी शहरातील बसथांब्यावरील स्मार्ट शेडची उभारणी झालेली नाही, अजूनही ते सांगाडे तसेच उभे असल्याचे चित्र दिसत असल्याने खरोखरच स्मार्ट बससेवा हीच का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कदंब महामंडळाला स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ईव्ही बसेस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काही कालावधीतच त्या सेवेत आणल्या आहेत. पणजीत ईव्ही बससेवा सुरू झाली आहे. लोकांचा हळूहळू या सेवेकडे कल वाढत आहे.

बसथांब्यांचे सांगाडे उभारल्यानंतर त्यावर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर सांगाड्याची रचना बदलण्यात आल्यानंतर पुन्हा ते तयार करण्यात आले. पुन्हा तयार करण्यात आलेल्या बसथांब्यांचा आराखडा न पटल्याने मोन्सेरात यांनी हे थांब्याचे डिझाइन बदलण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे जाहीर केले होते. मोन्सेरात यांनी आक्षेप घेतल्यानंतर अजूनही या थांब्यांवर संबंधित कंपनीने कामच केलेले नाही.

प्रवाशांचा कल वाढतोय!

या बसेस कदंब बसस्थानक, मिरामार, दोनापावला, गोवा विद्यापीठ, गोमेकॉ (बांबोळी), सांताक्रुझ पुन्हा बसस्थानक, त्याशिवाय मळा, फोन्तेइन्हास, भाटले, तांबडीमाती, सांतिनेज, १८ जून मार्ग अशा ठिकाणीही पोहोचू लागल्या आहेत. या बसेस गर्दीच्या वेळेत १५ मिनिटांच्या अंतराने आणि विषम तासांसाठी २० ते ३० मिनिटांच्या अंतराने उपलब्ध आहेत. हळूहळू या सेवेकडे प्रवासी वळू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT