Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Panaji Rain : राज्यात धुव्वाधार पावसाचे संकेत; चार दिवस ऑरेंज अलर्ट

Panaji Rain : विजांच्या कडकडाटासह वारेही वाहणार; राज्यात शुक्रवारी फोंडा, साखळी, सत्तरी, डिचोली येथे पावसामुळे बरीच पडझड झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Rain :

पणजी, राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून ''शिअर झोन''चा प्रभाव देखील वाढत असल्याने पुढील चार दिवस म्हणजे ८ ते ११ जूनपर्यंत धुव्वाधार पाऊस कोसळण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

राज्यात शुक्रवारी फोंडा, साखळी, सत्तरी, डिचोली येथे पावसामुळे बरीच पडझड झाली.

पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मागील २४ तासांत राज्यात एकूण ३१.१ मिमी पावसाची नोंद केली आहे. मॉन्सूनला सुरवात झाल्यापासूनची ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६३.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तरीही राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत अद्याप ३७.८ टक्के पावसाचा तुटवटा आहे.

मागील २४ तासांत सर्वाधिक ६५.४ मिमी पावसाची नोंद पेडणे आणि साखळीत झाली. त्या खालोखाल वाळपई ५८.८ मिमी, म्हापसा ५०.३ मिमी, सांगे ४४.८ मिमी, जुने गोवे २९ मिमी, काणकोण २५.२ मिमी, फोंडा २० मिमी, पणजी १४.४ मिमी, दाबोळी १२.२ मिमी, मुरगाव १०.४ मिमी, केपे १०.२ मिमी, मडगाव ८.४ मिमी पावसाची नोंद केली. आज राज्यात कमाल ३२, तर किमान २४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

पणजीत मोठा पाऊस कधी?

मॉन्सूनला सुरवात झाल्यापासून राजधानी पणजीत अद्याप मोठ्या प्रमाणात पावसाला प्रारंभ झालेला नाही. याबाबत शास्त्रज्ञ डॉ. एम. आर. रमेशकुमार म्हणाले, राज्यात सर्व भागांत येत्या काही दिवसांत मुबलक पाऊस पडेल. गोव्यात प्रामुख्याने पश्‍चिम घाटालगत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पणजी हा शहरी भाग आहे; परंतु येत्या काही दिवसांत पणजीत पावसाला सुरवात होईल, असे रमेशकुमार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट अधिक गडद होणार

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

SCROLL FOR NEXT