Panaji police station attack case  Dainik Gomantak
गोवा

पणजी पोलिस ठाणे हल्लाप्रकरणी सुनावणी पुन्हा तहकूब

ही सुनावणी आता येत्या 18 मार्चला ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी पोलिस ठाणे हल्लाप्रकरणीच्या खटल्यावरील सुनावणी सीबीआयला लंडनमध्ये असलेल्या एका संशयिताशी संपर्क साधता आला नसल्याने आज पुन्हा म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांनी सुनावणी तहकूब केली. ही सुनावणी आता येत्या 18 मार्चला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, हा खटला प्राधान्यक्रमाने घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेले असतानाही गेल्या जानेवारीपासून हा खटला सुनावणीसाठी अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आला.

मात्र, अजूनही सीबीआय वकिलाची बदली, संशयितांची अनुपस्थिती तसेच काही संशयित परदेशात गेल्याने वारंवार तहकूब होत आहे. खटल्यावरील सुनावणीत वारंवार चालढकलपणा होत असल्याने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली होती. संशयित हे वजनदार असल्याने ही सुनावणी लांबणीवर पडावी यासाठी प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त केला होता. बाबूश व जेनिफर मोन्सेरात यांच्यासह 37 जणांविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र ठेवले आहे.

फेब्रुवारी 2008 मध्ये पणजी पोलिस स्थानकावर हल्ला झाल्यानंतर त्यावरील आरोपपत्र सीबीआयने 2014 मध्ये दाखल केले. काही संशयितांनी या आरोपपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले व त्यावर अंतरिम स्थगिती मिळवून ते 2021 पर्यंत अंतिम सुनावणीस आले नाही. ॲड. रॉड्रिग्ज यांनी या प्रकरणासंदर्भात अर्ज सादर करून खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले व राजकारण्यांविरुद्धची प्रकरणे ही लवकर निकालात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचा संदर्भ दिला. त्यामुळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी गेली सात वर्षे प्रलंबित असलेल्या आव्हान याचिकांवर सुनावणी घेऊन त्या फेटाळल्या होता. आरोप निश्‍चिती करून त्यांच्याविरुद्धची सुनावणी लवकर घ्यावी असे निर्देश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT