Panaji Municipal Corporation budget of 101.67 crore presented  Dainik Gomantak
गोवा

पणजी पालिकेचा 101.67 कोटींचा अर्थसंकल्प सादर, कथित गैरव्यवहार सुरू

पणजी महानगर पालिकेचे 101 कोटींचे अंदाजपत्रक गडबडीत मंजूर

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी महापालिकेच्या आजच्या बैठकीत प्रचंड गोंधळात आणि घाई-गडबडीने 2022-2023 वर्षाकरिता 110.66 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. वाहन इंधन खरेदी घोटाळा व ट्रॅकिंग सिस्टीम नादुरुस्तीसंदर्भात नगरसेवकांनी स्पष्टीकरण मागून त्याची चौकशी करण्याची मागणी केली.

महापौर (Mayor) रोहित मोन्सेरात यांनी आज आगामी वर्षाकरिता महापालिका बैठकीत अंदाजपत्रक सादर केले. महापालिकेकडे महसूल जमा होण्यापेक्षा खर्च अधिक होत आहे. तसेच मागील अंदाजपत्रकातील महसूलप्राप्तीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांना यावेळी जाब विचारला.

महापालिकेला विविध प्रकारांतून सुमारे 84.48 लाख रुपये महसूल येणे आहेत, तर 17.17 लाख रुपये इतर महसूल दाखवला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या बँकेतील बचत खात्यावरील 2 टक्के व्याज, ठेव रक्कमेवरील 7 टक्के व्याज, महसूल निधी 7 टक्के, शुल्क व इतर प्रकारांतून 22 टक्के, पालिकेच्या भाडेपट्टीतून 4 टक्के, विविध कर मिळकतीतून 57 टक्के महसूल दाखवला आहे.

पणजी (Panaji) महापालिकेकडे विविध प्रभागातील विकासकामांसाठी पैसा नाही. कचर व्यवस्थापनावर 2 कोटी खर्च करत आहे. इंधन खरेदीमध्ये मोठा कथित गैरव्यवहार सुरू आहे. महापालिकेकडे असलेल्या 66 वाहनांना ट्रॅकिंग सिस्टीम होती ती नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे या महापालिकेच्या (Municipality) वाहनांवर नियंत्रणच नाही. यावर देखरेख ठेवण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करावी. या कथित गैरप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक प्रसाद आमोणकर यांनी केली. यावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, महापालिकेकडे असलेली अधिक तर वाहने जुनी आहेत त्यामुळे त्यांचे मायलेज कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT