Panaji Mayor Uday Madkaikar inaugurated the second phase of Miramar beautification work under the smart city project
Panaji Mayor Uday Madkaikar inaugurated the second phase of Miramar beautification work under the smart city project 
गोवा

मिरामार येथील सुशोभिकरणाचा दुसरा टप्पा खुला

दैनिक गोमंतक

पणजी: मिरामार येथील स्मार्ट सिटी अंतर्गत येत असलेल्या सुशोभिकरणाच्या कामाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज सायंकाळी महापौर उदय मडकईकर यांनी लोकार्पण केले. 


मिरामार किनाऱ्याच्या रस्त्यालगतचा भाग इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्यावतीने सुशोभित केला जात आहे. अमृत योजनेखाली या कामाला सुरुवात झाली असून, दोना पावला रस्त्यालगतचा भाऊसाहेब बांदोडकर यांच्या दक्षिणेकडील बाजूचा पहिल्या टप्प्याचे मागील काही दिवसांपूर्वी आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. चार टप्प्यांत हे काम करण्यात येणार असून, दोन कोटींच्यावर खर्च त्यासाठी केला जात आहे. 


मिरामार चौकातील पर्यटन खात्याच्या रेसिडेन्सीला लागून असलेल्या किनाऱ्याच्या भागाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. सायंकाळी महापौर मडकईकर यांनी या भागात उभारण्यात आलेले विद्युत दिवे कळ दाबून सुरू केले आणि हा भाग लोकांसाठी ये-जा करण्याकरिता खुला करण्यात आला. 


याप्रसंगी मडकईकर म्हणाले की, आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी शहराचा टप्प्याटप्प्याने कायापालट होणार आहे. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या मिरामार येथील सुशोभीकरणाचे दोन टप्पे लोकांसाठी खुले झाले आहेत. मिरामार येथील गोलाकार वाहतूक बेटही नव्याने सुशोभित केल्यानंतर या भागाचा पूर्ण चेहरामोहरा बदललेला असेल. सध्या महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांची डागडुजी सुरू झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काळात खराब झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरणाला प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's Live Update: 24/7 फॉर 2047! मोदींचा नवीन नारा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

SCROLL FOR NEXT