Labor Day 2024  Dainik Gomantak
गोवा

Labor Day 2024 : आमचे न्याय्य हक्क हिरावू नका ; पणजीत रॅली

Labor Day 2024 : कामगार दिनानिमित्त ‘आयटक’तर्फे आझाद मैदानावर सभा

गोमन्तक डिजिटल टीम

Labor Day 2024 :

पणजी, गोव्यात फार्मा कंपनीच्या कामगारांवर जे अत्याचार होत आहेत, ते ऐकल्यावर संताप येत आहे. फार्मा कंपन्या जनविरोधी कारवाया कुणाच्या मदतीने करतात हे तुम्हाला माहीत आहे.

त्यामुळे ज्यांनी तुम्हाला घरी बसविले, त्यांना लोकसभेत पाठवायचे की घरी बसवायचे, हे तुम्ही ठरवा, असे आवाहन ‘माकप’चे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर यांनी केले.

‘आयटक’तर्फे पणजी येथील आझाद मैदानावर कामगार दिनानिमित्त आयोजित ते सभेत बोलत होते. यावेळी ‘आयटक’चे अध्यक्ष प्रसन्ना उटगी, ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, ॲड. सुहास नाईक, नरेश शिरगांवकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘माकप’चे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर पुढे म्हणाले, पूर्वी ज्या कंपन्या नफ्यात आहेत, त्याच कंपन्या राजकीय पक्षांना देणग्या देऊ शकत होत्या. परंतु विद्यमान सरकारने नफा तसेच तोटा असलेल्या कंपन्यादेखील राजकीय पक्षांना ‘इलेक्ट्रोल बॉण्ड’ देऊ शकतात असा कायदा केला. त्यामुळे या कंपन्यांनी कुणाला देणग्या दिल्या, ते सर्वांना माहीत आहे.

कामगारांच्या मागण्या

राज्यात फार्मा कंपन्यांना लावलेला एस्मा मागे घ्या.

अकुशल कामगारांना

२६ हजार दरमहा वेतन द्या.

पंचायत, साबांखा, पूर्व प्राथमिक शिक्षकांना ७ वा वेतन लागू करा.

‘कदंबा’त ५ वर्षे कंत्राटी असलेल्यांना कायम करा.

सफाई कामगारांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करा.

कंत्राटी कामगार

प्रणाली रद्द करावी.

वीज खात्यात लाईन हेल्पर्सना सेवेत कायम करा.

आएसआयसी आणि पी.एफ.सुविधा सर्व कामगारांना मिळावी.

आरएनडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित ओव्हरटाईम वेतन द्या.

पोटावर लाथ मारणारे सरकार कशाला हवे?

राज्यातील फार्मा कंपन्यांमध्ये आपल्या मागण्यांसाठी कामगार एकत्र येऊ शकत नाहीत. आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन घोषणा देऊ शकत नाहीत. आपल्या हक्कांसाठी आवाज उठविणे, आंदोलन करणे, मोर्चा काढणे, घोषणा देणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे.

परंतु ‘एस्मा’ लावून तो अधिकार काढून घेतला आहे. जे सरकार कामगारांच्या पोटावर लाथ मारते, असे सरकार आम्हाला कशाला हवे ? असा सवाल ॲड. सुहास नाईक यांनी केला.

लोकसभेत पाठावयचे की, घरी बसवायचे ते ठरवा

फार्मा कंपन्यांनी ९४५ कोटींचे इलेक्ट्रोल बॉण्ड घेतले. या फार्मा कंपन्यांनी औषध बनविण्याच्या प्रक्रियेत गफला केला होते. त्यांच्यावर आयकर, ईडीच्या कारवाया होत होत्या. कायदे धाब्यावर बसवून कामगारांना घरी बसविणाऱ्यांना लोकसभेत पाठावयचे की, घरी बसवायचे ते तुम्ही ठरवा, असे अभ्यंकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT