Illegal Sand  Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Mining : बेकायदा रेती उत्खननाची चौकशी करा! उच्च न्यायालय

Illegal Sand Mining : राज्यातील गौण खनिजांच्या अनधिकृत उत्खननाची खात्री करण्यासाठी किंवा त्यावर उपाय योजण्यासाठी एक विश्वासार्ह कृती आराखडा तयार करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही यावेळी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Sand Mining :

पणजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी, २०१९ मधील जनहित याचिका निकालात काढताना, गोव्याच्या मुख्य सचिवांना रगाडा नदीतून वाळू, खडी आणि खडे यांचे बेकायदा उत्खनन करणे संरक्षित ठिकाणी कसे शक्य झाले, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.

तसेच न्यायालयात ७ सप्टेंबरपर्यंत मुख्य सचिवांना अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

या सुनावणीवेळी न्यायालयाने मुख्य सचिवांना सुनावले की, डीएमजी, पोलिस, वन आणि महसूल अधिकारी यांच्या माहितीशिवाय रगाडा नदीतून वाळू, खडी उपसा करणे संरक्षित ठिकाणी कसे शक्य झाले, याची सखोल चौकशी करा.

राज्यातील गौण खनिजांच्या अनधिकृत उत्खननाची खात्री करण्यासाठी किंवा त्यावर उपाय योजण्यासाठी एक विश्वासार्ह कृती आराखडा तयार करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही यावेळी दिले. 

चौकशीसाठी ४ महिन्यांची मुदत

याप्रश्‍नी उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी का याचा विचार करावा, असेही न्यायालयाने आदेशात सुचविले आहे. मुख्य सचिवांना चार महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश देत उच्च न्यायालयाने ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुपालन अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

...या अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार : बेकायदा उत्खननप्रश्‍नी वन, महसूल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करा, जेणेकरून अनधिकृत खाणकाम किंवा उत्खनन झाल्यास अशा अधिकाऱ्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी जबाबदार धरता येईल, असे न्यायालय म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT