Panaji Holi 2024  Dainik Gomantak
गोवा

Panaji Holi 2024 : पणजीत गुलालोत्सव जल्लोषात; राजकीय नेत्यांचा सहभाग

Panaji Holi 2024 : संगीतासह, बहुरंगी नृत्याचा साज; उपस्थित नागरिकांचा गुलालोत्सवाचा उत्साह द्विगुणित व्हावा, यासाठी सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Holi 2024 :

पणजी, रंगाची उधळण, संगीताच्या तालात आणि नृत्याच्या ठेक्यावर पणजीकर एकत्र येऊन जल्लोषात गुलालोत्सव साजरा करण्यात आला. सारे आझाद मैदाने रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असेच जणू म्हणत असल्याचा उत्साह उपस्थितांमध्ये दिसून येत होता.

राजधानी पणजीत शिमगोत्सव समितीद्वारे आझाद मैदानात गुलालोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

सकाळी ९ वा. शहराचे प्रमुख दैवत श्री महालक्ष्मीस नमन करून ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक रोमटामेळ श्री महालक्ष्मी संस्थानाच्या प्रांगणातून पणजी आझाद मैदानात येऊन गुलालोत्सवाला सुरुवात झाली. गुलालोत्सवाच्या प्रारंभावेळी उद्योजक श्रीनिवास धेंपे व त्यांच्या पत्नी पल्लवी धेंपे यांनी आझाद मैदान येथे सहभाग नोंदवला. राजधानी पणजीतील लहान मुले, ज्येष्ठ महिला तसेच तरुणाईने अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

जय श्रीरामाचा घोष

उपस्थित नागरिकांचा गुलालोत्सवाचा उत्साह द्विगुणित व्हावा, यासाठी सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गायकांनी विविध गाण्यांद्वारे नागरिकांच्या उत्साहात भर घातली. लहानमुलांसहित ज्येष्ठ नागरिकांनी गाण्यांवर ठेका धरला. परंतु ज्यावेळी भारत का बच्चा-बच्चा जय श्री राम बोलेगा या गाण्याच्या बोलावर नागरिकांच्या उत्साहाचे जल्लोषात रूपांतर झाले.

नेत्यांचाही गुलाल

आझाद मैदानावरील गुलालोत्सवात श्रीपाद नाईक, खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, उत्पल पर्रीकर सहभागी झाले होते.

खासदारांनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. उत्पल पर्रीकरांनी देखील श्रीपाद नाईक, सदानंद तानावडे यांना रंग लावत शुभेच्छा दिल्या. उपस्थित पणजीवासीयांच्या त्यांनी सहभाग नोंदवत गुलालोत्सवाचा उत्साह द्विगुणित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: विश्वविजेता 'भारत'! टीम इंडियाने सहाव्यांदा पटकावला 19 वर्षांखालील 'विश्वचषक'; फायनलमध्ये 100 धावांनी उडवला इंग्रजांचा धुव्वा

Betaki Khandola: सफर गोव्याची! गावकऱ्यांनी पाण्यासाठी मुलीचा बळी दिल्याची दंतकथा; विहंगम 'बेतकी'

Surya Gochar 2026: ग्रहांचा राजा 'सूर्या'चा धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश, 'या' 4 राशींना लागणार लॉटरी; अडकलेले पैसे परत मिळणार

Goa Vehicle Theft: एक-दोन नव्हे तर 7 चोरीच्या गाड्या जप्त! सराईत वाहन चोरट्याला ठोकल्या बेड्या, साळगाव पोलिसांचा 'स्ट्राँग' गेम

Viral Video: कॅफे आहे की डान्स फ्लोअर? टिप मिळताच वेटर्स धरतात ठेका, ग्राहकांच्या पसंतीस उतरतोय 'हा' खास अंदाज; नेटकरी फिदा

SCROLL FOR NEXT