Summer Heat Dainik Goamantak
गोवा

Panaji @ 35: सावधान! गोव्यात उष्मा वाढतोय, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Panaji Temperature @ 35: पुढील चोवीस तासांत पारा ३७ अंशांवर पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Temperature @ 35

तापमान वाढीने यंदा देशात विक्रम नोंदवला आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत ५२.३ डिग्री सेल्सिअस अर्थात शतकातील सर्वांत अधिक तापमानाची नोंद झाली. आता गोव्यातही तापमानाचा पारा चढत आहे.

आधीच 'स्मार्टसिटी'च्या कामांनी मेटाकुटीला आलेल्या राजधानी पणजीत आज ३५.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चोवीस तासांत पारा ३७ अंशांवर पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात यापूर्वी १४ व रोजी अधिक तापमान होते. १५ मे सध्या वातावरणातील आर्द्रता ६३ टक्क्यांवर आली आहे, जी ४ दिवसांपूर्वी ९०च्या पुढे होती. गेल्या १५ दिवसांत आज सर्वाधिक तापमान नोंदले गेले.

गुरुवारी मॉन्सून केरळात पोहोचल्याने तो पुढील ४ दिवसांत गोव्यात आपले अस्तित्व दाखवेल, असा अंदाज आहे. पावसाने सातत्य राखल्यास हवामानात गारवा जाणवेल. तोवर काळजी घेणे गरजेचे आहे.

यलो अलर्ट जारी!

राजधानी व परिसरात गुरुवारी रात्री तुरळक पाऊस झाला. राज्यात पुढील चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता असून, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

काय काळजी घ्याल?

1) अतिउष्णतेच्या परिस्थितीत शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण असणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.

2) प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

3) ताजे व हलके अन्न खाऊनच घराबाहेर पडावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT