Goa Beach Jellyfish | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: किनारी भागात आढळला जेलीफिश

Goa Beach: सावधगिरी पाळण्याचा संशोधकांचा सल्ला

दैनिक गोमन्तक

Goa Beach: पर्यटन हंगाम सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर काही समुद्रकिनारपट्टीवर जेलीफिश मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे. याचा फटका पर्यटकांना बसण्याची शक्यता आहे. ज्या भागात जेलीफिश आहेत, तेथे पोहणे टाळा, असा सावधगिरीचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

जगभरातल्या किनारपट्टीला धोका बनलेल्या जेलीफिशच्या काही जाती या विषारी असून त्यांचा दंश माणसासाठी सौम्य गंभीर आणि गंभीर ठरला आहे. फिलिपाईन्स सारख्या देशांमध्ये दरवर्षी जेलीफिशच्या दंशाला अनेक नागरिक बळी पडतात. राज्यातल्या करंजाळे, मीरामार सिक्केरी बायणा, पिकेन, ग्रांडी, या रिप भागात मोठ्या प्रमाणात जेलीफिश दिसत आहेत.

ज्येष्ठ समुद्र विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले म्हणाले, जेलीफिश संपूर्ण जगभर आणि दोन्ही ध्रुवीय प्रदेशातही आढळतात. पृष्ठभागाच्या पाण्यापासून खोल समुद्रापर्यंतही जेलीफिश आढळतात. स्कायफोझोआन्स - खारे जेलीफिश केवळ सागरी आहेत. परंतु हायड्रोझोआ सारखे जेलीफिश गोड्या पाण्यातही मिळतात.

संशोधकांच्या मते

  • राज्यात सापडणाऱ्या जेलिफिशचा डाटा उपलब्ध नसल्याने पर्यटक आणि नागरिकांनी त्यापासून सावध राहावे.

  • या भागांमध्ये जेलीफिश मोठ्या प्रमाणात दिसतात त्या समुद्रकिनाऱ्यावर पोहणे टाळावे. तरीही जेलीफिशचा दंश झाल्यानंतर जळजळ आणि वेदना सुरू झाल्यानंतर तातडीने वेनेगार किंवा मिठाचे पाणी लावावे.

  • जेलिफिशच्या दंशावर अँटीहिस्टामाईन्स, इम्युनोबेस्ड अँटीवेनिन्स वापरले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT