Panaji Fish Market  X
गोवा

Panaji Fish Market: महिना उलटला तरी पणजी मार्केटमधील विक्रेत्यांचे स्थलांतर नाही! मनपा उदासीन; व्यावसायिकांना फटका

Panaji Fish Market Relocation: मांसविक्रेत्यांचा व्यवसाय गेल्‍या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यांचे कामगार दुसरीकडे कामाला गेल्यास पुन्हा येणार नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: येथील मासळी मार्केटमधील जुनी इमारत हटविल्यानंतर तेथे व्यवसाय करणाऱ्या मांसविक्रेत्यांच्या निर्माण झालेल्या स्थलांतराच्‍या प्रश्‍‍नावर सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देताना त्‍यांना दिलासा दिला होता. मात्र एक महिना उलटला तरी त्यांचे स्थलांतर करण्याबाबत महानगरपालिका फारशी आग्रही असल्‍याचे दिसत नाही.

तर, दुसऱ्या बाजूने इमारत पाडल्यापासून सहा महिने मांसविक्रेत्यांच्‍या दुकानांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाकाम वेतन द्यावे लागत आहे.

येथील कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आमच्या सहा विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा आदेश मनपाला दिल्यानंतर आम्हाला दुकाने थाटण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु आता एक महिना झाला तरी मनपाने त्‍याबाबत विचार केलेला नाही.

मन्ना बेपारी, अध्‍यक्ष-कुरेशी मीट ट्रेडर्स असोसिएशन

मांसविक्रेत्यांचा व्यवसाय गेल्‍या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यांचे कामगार दुसरीकडे कामाला गेल्यास पुन्हा येणार नाहीत. यासाठी त्‍यांना विनाकाम वेतन द्यावे लागत आहे. मनपाने लवकरात लवकर आम्हाला व्यवसाय करण्याची सोय करून द्यावी. दुकाने बंद राहिल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍‍न निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT