drunk drivers Dainik Gomantak
गोवा

Goa Police : मद्यपी चालक पोलिसांच्या रडारवर; तीन दिवसांत १५० प्रकरणे नोंद

Goa Police : गेल्या तीन दिवसांत १५० मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. यावर्षी आतापर्यंत (१ जानेवारी ते ९ जूनपर्यंत) २,३१८ मद्यपी चालकांची प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यातील २ हजारांहून अधिक जणांच्या परवाना निलंबनासाठी शिफारस करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police :

पणजी, राज्यात रात्रीच्यावेळी वाढत्या रस्ता अपघातांमुळे वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधात धडक मोहीम सुरू केली असली तरी मद्यपी चालकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

गेल्या तीन दिवसांत १५० मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. यावर्षी आतापर्यंत (१ जानेवारी ते ९ जूनपर्यंत) २,३१८ मद्यपी चालकांची प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यातील २ हजारांहून अधिक जणांच्या परवाना निलंबनासाठी शिफारस करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात वेर्णा येथे एका बसचालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून चार निष्पाप कामगारांचा बळी घेतला होता. त्याची दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी आता रात्रीच्यावेळी चारचाकी वाहनांच्या चालकांची अल्कोमीटरने तपासणी सुरू केली आहे. वाहतूक विभागाने मागील तीन आठवड्यांत दर शुक्रवार ते रविवार रात्री ८ ते ११ वा.दरम्यान मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे.

या मोहिमेअंतर्गत ७ जून ते ९ जून दरम्यानच्या काळात तब्बल १५० मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १ जानेवारी ते २ जून २०२४ दरम्यान २,३१८ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे तर त्याच कालावधीत २०२३ मध्ये ५३५ मद्यपी चालकांवर कारवाई केली होती.

वाहतूक पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयाचे वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सुदेश नार्वेकर आणि दक्षिण गोवा वाहतूक उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वाहतूक विभागाने ही विशेष मोहीम राबवली.

राज्यातील विविध ठिकाणी गस्ती वाढवून तसेच नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तीन दिवस केलेल्या तपासणीत ५० मद्यपी चालकांवर कारवाई केली. त्यात फोंडा वाहतूक विभागाने सर्वाधिक १७ मद्यपी चालकांवर कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ म्हापसा पोलिसांनी १४ जणांवर कारवाई केली.

वाहतूक पोलिस मद्यपी चालक

पणजी ११

पर्वरी ११

म्हापसा १४

कळंगुट ११

हणजूण ६

डिचोली ९

मोपा विमानतळ ७

पेडणे १२

वाहतूक पोलिस मद्यपी चालक

मडगाव १०

फोंडा १७

वास्को १३

कोलवा ३

केपे ५

कुडचडे १

काणकोण १२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT