Panaji Bus Stand Condition Sandip Desai
गोवा

Panaji Bus Stand : पणजी बसस्थानक अनेक समस्यांच्या गर्तेत; अनेक ठिकाणी खड्डे

नाल्यात पाणी तुंबत असल्याने आरोग्यासंबंधी विविध प्रश्‍न उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी शहरात दरदिवशी हजारो नागरिक बसने प्रवास करत असतात, परंतु पणजी बसस्थानक अनेक समस्यांच्या गर्तेत अडकले असून बसस्थानकावर अनेक समस्या आहेत. पणजी बसस्थानकावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. प्रवेश मार्गावरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.

पणजी बसस्थाकावर गटारांची योग्य प्रकारे डागडुजी न केल्याने तसेच गटारावरील सिमेंटच्या लाद्या फुटल्याने बसचा टायर या गटारांमध्ये जाऊ शकतो. तसेच बसस्थानकावर जेथे म्हापसा बस थांबते त्या ठिकाणी लोखंडी जाळी गटारावर आहे ती देखील सुटल्याने तेथेही बसचा टायर आत जाऊ शकतो.

म्हापसा बस जेथे लागते तेथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्याने ते प्रवाशांसाठीही धोक्याचे ठरत आहे. कदंब बसस्थानकावर स्वच्छतेचा तसेच प्रवाशांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न देखील उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मागील तीन वर्षांपासून बस स्थानकांचे उडालेले पत्रे घातल्याने नागरिकांना आता या शेडमध्ये बससाठी थांबता येते अन्यथा नागरिकांना बससाठी थांबणे कठीण होत होते.

नाल्यामुळे दुर्गंधी

बसस्थानकाशेजारी एक नाला आहे त्या नाल्यात गलिच्छ पाणी साचलेले आहे, तसेच अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरलेली आहे. पावसाळ्यात या नाल्यातील गलिच्छ पाणी स्थानकात येते. नाल्यात पाणी तुंबत असल्याने आरोग्यासंबंधी विविध प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT