CJI DY Chandrachud Dainik Gomantak
गोवा

Panaji News : दिव्यांगांच्या हक्करक्षणासाठी मजबूत कायदेशीर चौकट हवी : सरन्यायाधीश चंद्रचूड

India Accessibility Summit : इंडिया ॲक्सेसिबिलिटी समिट आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त परिषद २०२४ मध्ये चंद्रचूड यांनी ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-२०२४ विषयीच्या कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, देशातील दिव्यांगांच्या हक्करक्षणासाठी मजबूत कायदेशीर चौकट हवी. शिवाय भविष्यात देशात दिव्यांगांना सर्वसमावेशी समाजात सहजपणे वावरता येईल, अशी वातावरण निर्मिती होणे मला अपेक्षित आहे.

दिव्यांगांना समाजाच्या सर्वच क्षेत्रांत सुलभ सहभागी होता यावे, यासाठीच्या आवश्यक उपाययोजनांसाठी दिव्यांगांसमवेत नियमित संवाद होणे आवश्यक ठरेल,असे देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.

इंडिया ॲक्सेसिबिलिटी समिट आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त परिषद २०२४ मध्ये चंद्रचूड यांनी ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-२०२४ विषयीच्या कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन केले. दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशकता आणि प्रवेशसुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून बेंगळुरूत आयोजित हा उपक्रम उपयुक्त ठरला.

या प्रकाशन समारंभास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न, केंद्रीय दिव्यांगजन आयुक्त तसेच केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अगरवाल (आयएएस), कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. अंजारिया, पद्मश्री पुरस्कारप्राप्त तसेच पर्पल अम्बेसिडर व्यंकटेश येथिराज आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त (गोवा) गुरुप्रसाद पावसकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, कॉफी टेबल बुक हे केवळ अनुभवांचे संचित एवढ्यापुरतेच मर्यादित नसून, सर्वसमावेशक आणि प्रवेशसुलभ समाजाच्या दिशेने आपल्या सामूहिक प्रवासाचे प्रतिबिंब आहे. सर्व व्यक्तींच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करत राहण्याच्या विचारांचा आपण पुरस्कार करत राहणे आणि त्यासाठी पूरक धोरण राबवणे आवश्यक आहे.

दिव्यांगांमधील जिद्द, निर्धार आणि त्यांची यशोगाथा साजरी करण्यासाठी एक आशेचा किरण आणि प्रभावी व्यासपीठ म्हणून ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट’ हा उपक्रम काम करत आहे. कोणत्याही क्षमताच्या पलीकडे जात प्रत्येक व्यक्तीला संधी आणि संसाधनांचा लाभ घेण्यासाठी समान न्याय मिळावा ही आमची वचनबद्धता आहे.

-गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT