Palolem beach Couple Death Dainik Gomantak
गोवा

कुटुंबाला न सांगता गोव्यात आलेल्या प्रेमीयुगूलाचा मृत्यू, पोस्टमार्टमनंतर समोर आली धक्कादायक माहिती

युगुलाने बदलली होती 3 हॉटेल्‍स; अंत्‍यसंस्‍कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्‍या ताब्‍यात

Akshay Nirmale

ओव्हरे-पाळोळे समुद्रात बुडून मृत्‍यू झालेले सुप्रिया दुबे व विभू शर्मा या प्रेमीयुगुलाबाबत धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. दरम्यान, या दोघांचे नातेवाईक काणकोण येथे आल्यानंतर पुढील सोपस्कार पुर्ण करून दोघांचेही मृतदेह उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. (Palolem beach Couple Death)

काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, या युगूलाने अतिप्रमाणात मद्यसेवन केले होते. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातूनच त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी उत्तररात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. उशिरापर्यंत किनाऱ्यावर मौजमजा केल्यानंतर सुप्रिया ही समुद्रात उतरली. तोल गेल्‍याने ती बुडू लागली. गटांगळ्या खात तिने ‘हेल्प, हेल्प’ असा आरडाओरडा केला. काही परदेशी पर्यटक तिच्या मदतीसाठी धावून गेले.

तोपर्यंत प्रियकर विभू हा तिच्या जवळ पोहोचला. त्याने तिला वाचविण्‍यासाठी घट्ट मिठी मारली. या खटपटीत तोही समुद्रात दिसेनासा झाला, अशी माहिती काही प्रत्‍यक्षदर्शी पर्यटकांनी दिल्‍याचे माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले.

युगुलाने 3 हॉटेल्‍स बदलली

रविवारी ओव्हरे येथे एका हॉटेलात उतरलेल्या दुबे व शर्मा या युगुलाने 3 हॉटेल्‍स बदलली; मात्र त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या दोघांचे अन्‍य मित्रही गोव्यात आले होते. तथापि, ते पाळोळे येथे न राहता वार्का येथे राहिले होते.

सुप्रिया ही बंगळुरू येथे आयटी कंपनीत काम करीत होती; तर विभू हा मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत होता. हे दोघेही कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता गोव्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आले होते. दोघेही येथे साखरपुडा करणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT