Pallavi Dhempe Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: पल्‍लवींना विजयी करण्‍यासाठी जीवाचे रान करू

Lok Sabha Election: पक्षच श्रेष्‍ठ : निराशा झटकून सावईकर, दामू आणि कवळेकर करणार प्रचार, दिली ग्‍वाही

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election:

दक्षिण गोव्‍यातून भाजपची उमेदवारी आम्‍हाला मिळावी यासाठी आम्‍ही प्रत्‍यक्षात कुठलाही प्रयत्‍न केला नव्‍हता. मात्र, आमच्‍या नावांची चर्चा चालू होती, ही गोष्‍ट खरी आहे. परंतु आता पक्षाने पल्‍लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्‍यामुळे ही चर्चा बंद झाली आहे.

आता आमचे एकच लक्ष म्‍हणजे दक्षिण गोव्‍यातून भाजपचा उमेदवार जिंकवून आणणे आणि त्‍यासाठी आम्‍ही जीवाचे रान करू, अशी स्‍पष्‍ट ग्‍वाही उमेदवारीच्‍या रेसमध्‍ये असलेले माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर आणि माजी आमदार दामू नाईक यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

माझे नाव जरी उमेदवारीच्‍या चर्चेत असले तरी मी वैयक्‍तिकरीत्‍या त्‍यासाठी कधीच प्रयत्‍न केला नाही. भाजप शिस्‍तबद्ध पक्ष असून पक्षाचा जसा आदेश येतो तसे काम करणे हे आमच्‍या रक्‍तात भिनले आहे. आमच्‍या हातात जरी वेळ कमी असला तरी आम्‍ही आमच्‍या कार्यकर्त्यांच्‍या माध्‍यमातून पल्‍लवी धेंपे यांचे नाव प्रत्‍येक मतदारांपर्यंत पोहोचवू याची मला खात्री आहे.
- ॲड. नरेंद्र सावईकर
देश आणि पक्ष हे स्‍वत:च्‍या वैयक्‍तिक आकांक्षांपेक्षा नेहमीच श्रेष्‍ठ आहेत, हे मानणारा मी आहे. मी माझे मत यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे. पक्षाचा आदेश मला कालही श्रेष्‍ठ होता, आजही श्रेष्‍ठ आहे आणि उद्याही श्रेष्‍ठच असेल.
- दामू नाईक
उमेदवारी मिळावी अशी इच्‍छा कुणी व्‍यक्‍त केल्‍यास त्‍यात काही वावगे नाही. मला दक्षिण गोव्‍यात लाेकांकडून जो प्रतिसाद मिळत होता त्‍यावरून यावेळी मी जिंकून येणार याची खात्री वाटत होती. त्‍यामुळेच मी हा दावा केला हाेता. मात्र, पक्षाने पल्‍लवी धेंपे यांना उमेदवारी दिली आहे, त्‍यामुळे आता माझे काम मला जो लोकांचा पाठिंबा हाेता तो संपूर्णत: धेंपे यांच्‍या बाजूने वळविणे हे असून त्‍यासाठी मी फक्‍त केपेतच नव्‍हे तर संपूर्ण दक्षिण गोव्‍यात काम करेन.
- बाबू कवळेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT