Paim Buddounk tradition in Goa
Paim Buddounk tradition in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील प्राचीन 'पांय बुडोंवक' प्रथा, विविध आजारांवर गुणकारी; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

Pramod Yadav

Paim Buddounk tradition in Goa: शरीराची लाही-लाही उडवणाऱ्या उन्हामुळे सर्वचजण हैराण आहेत. कधी एकदा पावसाच्या सरी बरसतील आणि गर्मीपासून दिलासा मिळेल याची प्रत्येकजण प्रतिक्षा करत आहे. तळपते ऊन आणि असह्य गर्मीमुळे अनेक त्वचा रोगांना देखील आमंत्रण दिले जाते.

त्वाचा रोगांपासून बचावासाठी वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदात अनेक उपचारपद्धती सांगितल्या आहेत. तसेच, गोव्यात पावसाळ्यापूर्वी त्वचा रोगांपासून बचावसाठी 'पांय बुडोंवक' ही प्राचीन आणि पारंपरिक प्रथा प्रसिद्ध आहे. काय आहे 'पांय बुडोंवक' प्रथा, त्याचा इतिहास आणि महत्व जाणून घेऊया. (Ocean salt water treatment)

काय आहे 'पांय बुडोंवक' प्रथा आणि त्याचा इतिहास?

गोव्यात दरवर्षी येथील स्थानिक समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यात आंघोळ करतात किंवा त्याता पाय बुडवून बसतात. समुद्राचे क्षारयुक्त पाणी अनेक त्वचारोग, त्वचेसंबधित इतर आजारांवर गुणकारी असल्याचा समज येथील लोकांचा आहे. वर्षोनवर्षे ही प्रथा येथील ज्येष्ठ ते लहान मुलांपर्यंत सर्वचजण पावसाळा सुरू होण्यापूर्वी करतात.

'पांय बुडोंवक' या शब्दाचा उगम 'थॅलसा' या ग्रीक शब्दापासून झाला आहे. आणि प्रथेचे उगम देखील ग्रीसमधून झाल्याचे सांगितले जाते. सुमारे 2500 वर्षांपूर्वी, इसब, संधिवात, दमा आणि पाठदुखी यावर उपचार करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर केला जात असे. तसेच, मानसिक शांतता मिळते ज्यामुळे चिंता आणि नैराश्य यासारखी लक्षणे कमी होतात. असा लोकांचा विश्वास आहे.

महत्व आणि फायदे!

जपानमध्ये थॅलासोथेरपीच्या संबधित एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये त्वचेचे सामान्य आजार, त्वचेच्या दाहासाठी समुद्राचे पाणी प्रभावी उपचार असू शकते असे निरीक्षण नोंदवण्यात आले.

गोव्यात दरवर्षी या प्रथेचे पालन केले जाते. समुद्रात पाय बुडवल्यानंतर सकारात्मक परिणाम जाणवतात. यामुळे चालताना होणारा त्रास, पाय सुजणे आणि वेदना यांसारख्या विविध आजारांपासून दिलासा मिळतो. झोप सुधारते आणि हलकेपणा जाणवतो. याशिवाय इसब, संधिवात, दमा आणि पाठदुखी यासारख्या आजावर देखील ते गुणकारी आहे. असे येथील लोक मानतात.

समुद्राच्या पाण्यात पाय बुडवल्याने पायाच्या भेगा मऊ होतात, मृत त्वचा गळून पडते आणि त्वचेला पुनरुज्जीवन मिळते. नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून देखील हे कार्य करते आणि शरीरातील विषारी पदार्थ स्वच्छ करते.

दरवर्षी, बहुतेक गोवावासीय, विशेषत: वृद्ध लोक समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यात आंघोळ करण्यासाठी किंवा समुद्रात पाय बुडवण्यासाठी समुद्र किनाऱ्यांना भेट देतात. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांतील पाणी खूप खारट असते, त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो अशी मान्यता आहे. पूर्वीच्या काळी, आई-वडील अनेकदा आपल्या मुलांना घेऊन समुद्रकिनारी जायचे. अलिकडे अनेकजणांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे.

तशी आनंददायक असणारी ही परंपरा केवळ शारीरिक आरोग्याला चालना देत नाही तर गोव्याच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून देखील पाळली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही प्रथा पूर्ण करायलाच हवी अन्यथा वर्षभर विविध अडचणींचा समाना करावा लागेल अशी मान्यता येथील स्थानिकांची आहे.

दरम्यान, याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. मात्र, 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात, 'पांय बुडोंवक' या प्रथेमुळे शारीरिक वेदना कमी होतात याबाबत ठोस पुरावा नाही. पण, तणाव आणि चिंतापासून मुक्त होण्यास मदत मिळते. तसेच, शरीर, मनाला उपचारांसाठी प्रोत्साहन मिळते. असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT