vegetable packing Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: रोजगाराच्‍या नव्या संधी देणारं ‘पॅक हाऊस’ नक्की आहे काय?

मोपा येथे होणारा ‘पॅक हाऊस’ हा नवीन प्रयोग गोव्यातील कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळवून देणारा ठरू शकतो.

दैनिक गोमन्तक

भारतासह जगामध्ये कृषी क्षेत्रात साधनसुविधांबरोबरच व्यापारीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शेतीत नवनवे प्रयोग करण्यात येत आहे. त्‍यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आपला देश जगात कृषी क्षेत्रात अग्रेसर ठरण्‍याच्‍या दिशेने पावले टाकत आहे.

गोव्यातही शेतीच्‍या लागवडीसाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. द्रोणाद्वारे शेती, बागायतीत प्रयोग सुरू आहेत. आता ‘पॅक हाऊस’ हा नवीन प्रयोग गोव्यातील कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळवून देणारा ठरू शकतो.

आदर्श कृषी सोसायटी तसेच गोवा ॲग्रीकल्चर प्रोड्युस मार्केटिंग महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी गोव्यात ‘पॅक हाऊस’ची संकल्पना साकार होणार असल्याचे सांगितले. हल्लीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संचालनालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने वाशी-महाराष्ट्र येथील ‘पॅक हाऊस’ला भेट दिली होती.

आता हे ‘पॅक हाऊस’ मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळाच्या काही किलोमीटर अंतरावर स्थापन करण्याचा विचार आहे. सदर ‘पॅक हाऊस’चे काम यंत्रसामग्री किंवा स्वत:च्‍या हातानेही करता येण्यासारखे आहे. मात्र, हे पॅक हाऊस आमच्या सोसायटीतर्फे की कृषी खात्यातर्फे की गोवा ॲग्रीकल्चर प्रोड्युस महासंघातर्फे चालविले जाईल याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असेही वेळीप यांनी स्पष्ट केले.

पॅक हाऊस म्हणजे काय?

पॅक हाऊस म्हणजे एक केंद्र, जेथून शेतकऱ्यांकडून भाजी, फळे, शेती व बागायतीतील कच्ची उत्पादने घेतली जातात. नंतर ही उत्पादने प्रक्रियेद्वारे निर्यात करण्यासाठी तयार केली जातात. यात उत्पादने वेगवेगळी करणे, स्वच्छ करणे, ती काही काळासाठी विशिष्‍ट तापमानात ठेवणे, गरजेनुसार ती साठवून ठेवणे व नंतर मागणीनुसार इतर राज्यांमध्‍ये किंवा‍ देशांमध्ये निर्यात करता येतात.

शेतकऱ्यांना मिळेल चांगला बाजारभाव

गोव्यातील काजू, केळी, आंबे, नारळ, पपया, फणस या फळांबरोबरच सुपारी तसेच वांगी, भेंडी, मिरची, दुधी, मुळा किंवा इतर पालेभाज्या अन्‍य राज्‍यांत किंवा इतर देशांमध्ये निर्यात करणे शक्य आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राची उत्पादन क्षमता वाढेल. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल व अनेकांना रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RGP Goa Internal Differences: 'आरजी'मधील वादामुळे लोकांचा झाला भ्रमनिरास; वीरेश बोरकर गोवा राखण्यासाठी करणार युती?

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

SCROLL FOR NEXT