P Chidambaram
P Chidambaram Dainik Gomantak
गोवा

जो गोवा जिंकतो, तो दिल्ली जिंकतोच: काँग्रेस नेते चिदंबरम

दैनिक गोमन्तक

आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असल्याने देशातील राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी गोवा (Goa) दौरा करत भाजपला गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं साकडं यावेळी गोमंतकियांना घातलं आहे. तसेच गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपबरोबर कॉंग्रेस, तृणमुल कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी विधानसभा निवडणूकीची जय्यत तयारी सुरु केली आहे.

चिदंबम म्हणाले, पुढील वर्षी होणारी गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly elections) आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात आम्ही यशस्वी होणार आहोत. पणजीत निवडणूक प्रचार कार्यालय सुरु केल्यानंतर चिदंबरम कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. (P Chidambaram) ते पुढे म्हणाले, 'मला तुम्हाला इतिहासातील एक गोष्ट सांगायची आहे..जो कोणी गोवा जिंकतो, दिल्लीत जिंकतो. 2007 मध्ये आम्ही गोवा जिंकलो..2009 मध्ये आम्ही दिल्ली जिंकलो. दुर्दैवाने 2012 मध्ये आम्ही गोवा गमावला, 2014 मध्ये आम्ही दिल्लीलाही गमावले. 2017 मध्ये गोवा जिंकला पण आमचे आमदार ते हरले. ते पुढे म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.

चिदंबरम पुढे म्हणाले, यावेळी पक्ष धैर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे जात असून 2022 मध्ये गोवा आणि 2024 मध्ये दिल्ली (Lok Sabha elections) जिंकेल. .सध्या काँग्रेसकडे सध्या राज्यात फक्त चार आमदार आहेत.

तसेच, चिदंबरम पुढे म्हणाले, 'इतिहास आपला आहे. आज आपण एका शुभ दिवसापासून सुरुवात करत असून आपल्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते झाले आहे. कामगारांना संबोधित करताना ते म्हणाले, गोव्याची प्रगती ज्यावेळी झाली ते सुवर्ण दिवस त्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत. उद्योग, शाळा-महाविद्यालय आणि रस्ते यासारख्या क्षेत्रात गोव्याची उत्तम प्रगती झालेली आहे. आम्ही 2022 पासून गोव्याचा सुवर्णकाळ परत आणू. धैर्य आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे मी तुम्हाला आवाहन करतो. चिदंबरम असेही यावेळी म्हणाले. राजकीय पक्षांनी गोव्याला वसाहत बनवू नये. कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख न करता चिदंबरम यांनी भाजपवर निशाणा साधला. गोवा आक्रमणकर्त्यांची राजकीय वसाहत बनू शकत नाही. गोव्यावर गोमंतकियांचे राज्य असेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT