Paroda Bike Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: ओव्हरटेकचा मोह दुसऱ्याच्या जीवावर बेतला; पारोडा येथे दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

Paroda Fatal Accident: सरफराज दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याची दुचाकी रोशनच्या दुचाकीला धडकली.

Pramod Yadav

Paroda Fatal Accident

पारोडा: ओव्हरटेकचा मोह दुसऱ्याच्या जीवावर बेतल्याची घटना पारोडा येथून समोर आली आहे. आज (२५ डिसेंबर) सकाळी ८.४५ वाजता झालेल्या अपघातात ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (बी) आणि १०६ (१) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Paroda Bike Accident

या अपघातात रोशन मुजावर (वय ४१, शिरवई - केपे) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन मुजावर (GA 09 7980) या दुचाकीवरुन जात असताना मोहम्मद सरफराज (GA 08 AP 1165) याच्या दुचाकीसोबत धडक झाली. सरफराज दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याची दुचाकी रोशनच्या दुचाकीला धडकली. यात रोशन मुजावर गंभीर जखमी झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोशनचा मृत्यू झाला आहे. केपे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (बी) आणि १०६ (१) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधिक तपास करताहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

SCROLL FOR NEXT