Over the month Corona condition in goa has been improving
Over the month Corona condition in goa has been improving 
गोवा

गोव्यात कोरोनाची स्थिती चांगलीच सुधारत आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: या महिन्याभरात कोरोनाची राज्यातील स्थिती चांगलीच सुधारत आहे. आज राज्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. या महिन्यात आजचा चौथा दिवस असा आहे की ज्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, कोरोनाबाबतचा रिकव्हरी रेटसुद्धा चांगल्या प्रकारे वाढत आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजचा रिकव्हरी रेट ९५.७३% इतका आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज १९८ लोकांना कोरोनाची लागण झाली ते १६३ लोक कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यभरात एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज ज्या रुग्णांना लागण झाली त्यातील १०९ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ४८ लोकांना भरती करून घेण्यात आले. गेल्या चोवीस तासात दोन हजार पाचशे वीस कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या. 

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT