gas cylinders in goa Dainik Gomantak
गोवा

Free Cylinder in Goa : गुडन्यूज; गोव्यात 37 हजार कुटुंबांना आता मिळणार मोफत सिलिंडर

विधानसभा अधिवेशनात अनुदानित मागण्यांना मंजुरी मिळाली आणि वित्त खात्याने या योजनेला रितसर मान्यताही दिली आहे, अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) लोकांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना विचाराधीन असल्याचे उत्तर सरकारने नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात दिले असले तरी जुलै महिन्यातच या गटाला मोफत सिलिंडर देण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी दिली.

राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन राजपत्रात त्यासंदर्भातील माहिती प्रसृत केल्यानंतर मोफत सिलिंडर देणे सुरू होईल, असे सांगून गावडे म्हणाले की, शुक्रवारी विधानसभा अधिवेशनात अनुदानित मागण्यांना मंजुरी मिळाली आणि वित्त खात्याने या योजनेला रितसर मान्यताही दिली आहे. त्यामुळे मोफत सिलिंडर देण्याची प्रक्रिया आता वेगाने पूर्णत्वास जाईल. अनुदानित मागण्यांच्या मंजुरीसाठीच ही योजना अडकून राहिली होती. राज्यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींची संख्या 37 हजार असून, या कार्डधारकांना मोफत सिलिंडर देण्याची योजना राबवण्यासाठी वर्षाकाठी 24 कोटी रुपये खर्च येणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारने वर्षाकाठी तीन मोफत सिलिंडर देणार म्हणून घोषणा केली. आपल्या संकल्प पत्रात ज्या २२ योजना दिल्या होत्या, त्यापैकी मोफत सिलिंडरची योजना महत्त्वाची होती. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर व मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या योजनेला मान्यता दिली गेली होती.

त्यानंतर ती योजना केव्हा सुरू होणार याविषयी राज्यातील लोकांना उत्सुकता होती. राज्य सरकारला सरसकट जनतेला ही योजना लागू करणे शक्य झाले नाही. त्यामुळे राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 37 हजार बीपीएल कुटुंबांना वर्षातून तीन सिलिंडर मोफत देण्याचे जाहीर केले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला ही योजना मार्गी लागेल असे वाटत होते, परंतु आता ती शेवटच्या आठवड्यात अंमलात येणार असल्याचे सूतोवाच मंत्री गावडे यांनी केले आहेत.

अल्प उत्पन्न गटालाही मिळणार लाभ

बीपीएल लाभार्थ्यांना सिलिंडर देण्यास सुरुवात झाल्यानंतर चार लाख रुपये प्रतिवर्ष आर्थिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांनाही सिलिंडर देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. परंतु ही योजना तत्काळ अंमलात आणण्यासाठी एकूण लाभार्थी किती आणि त्यासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, हे पाहावे लागणार आहे.

योजनेत तीनवेळा बदल

विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘आप’ने पाणी, वीज, तीर्थाटन मोफतच्या घोषणा केल्याने तत्कालीन राज्य सरकार ‘बॅकफूट’वर गेले होते. याला काऊंटर प्रचारनीतीचा भाग म्हणून सर्वांना मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली. भाजप सरकार सत्तेवर आल्यावर या योजनेत बदल करून त्याला उत्पन्न मर्यादेची अट घातली.

अधिवेशनातही चर्चा

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मोफत तीन सिलिंडर देण्याच्या योजनेविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला मंत्री गोविंद गावडे यांनी लेखी उत्तर दिले. त्यात त्यांनी ही योजना सरकारच्या विचाराधीन असल्याचे नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT