Dengue Cases in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Dengue Cases: गोव्यात ऑगस्टमध्ये आढळले डेंग्युचे 3000 हून अधिक संशयित रूग्ण; 80 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट

Goa Dengue Cases: उत्तर गोव्यात 70 तर दक्षिण गोव्यात 10 जणांना डेंग्यू

Akshay Nirmale

Goa Dengue Cases in August: गोव्यात ऑगस्ट महिन्यात डेंग्युचे 3,119 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 80 डासांमुळे होणाऱ्या या विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्य सेवा संचालनालय (DHS) च्या आकडेवारीनुसार उत्तर गोव्यात डेंग्यूच्या एकूण 70 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दक्षिण गोव्यात डेंग्युचे 10 रूग्ण आहेत.

या वर्षी, म्हापसा (14), साळीगाव (12) आणि साखळी (11) येथे डेंग्युची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 2195 संशयित रुग्ण आढळले होते तर त्यापैकी 95 जणांना डेंग्यू झाला होता.

DHS पणजी येथील विषाणूजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या नोडल ऑफिसर डॉ. कल्पना महात्मे यांच्या माहितीनुसार संशयित रुग्ण आता बरे झाले आहेत.

जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत गेल्या वर्षी 250 च्या तुलनेत यंदा 180 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.

ऑगस्टमध्ये पावसाने ब्रेक घेतल्याने बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिले. त्यामुळे डासांची उत्पत्ती झाली आहे.

नागरीकांनी डेंग्यूबाबत घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु त्यांच्या घराभोवती किंवा कामाच्या ठिकाणी पाणी साचणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

लोकांनी फ्लॉवरपॉट्स, अॅक्वेरियमचे पाणी वेळोवेळी बदलावे. एअर कंडिशनरमधून पाणी गोळा करणारे रिसेप्टॅकल्स रिकामे करावेत.

आरोग्य केंद्रांच्या कामगिरीमुळे डेंग्यूचे रुग्ण कमी होत आहेत. आरोग्य केंद्रांनी माहितीची मोहिम राबवली, क्षेत्र तपासणी केली तसेच डेंग्युच्या स्त्रोतांची माहिती घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही केली.

स्वच्छता कर्मचारी राज्यभरात विविध ठिकाणी फॉगिंग करत आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी अँटी-लार्व्हा एजंट्सचा वापर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT