PM Narendra Modi Goa Visit Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: केपेतून एक हजारावर कार्यकर्ते मोदींच्या सभेला हजर राहणार

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्‍या 6 फेब्रुवारी रोजी गोव्‍यात येत आहेत. त्‍यांच्‍या या भेटीचे औचित्य साधून भाजपने भव्य सार्वजनिक रॅलीची आयोजन केले आहे.

दैनिक गोमन्तक

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्‍या 6 फेब्रुवारी रोजी गोव्‍यात येत आहेत. त्‍यांच्‍या या भेटीचे औचित्य साधून भाजपने भव्य सार्वजनिक रॅलीची आयोजन केले आहे.

मोदींच्‍या भव्य सभेला केपे मतदारसंघातून एक हजारावर भाजप समर्थक उपस्थित राहणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे उपाध्‍यक्ष बाबू कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सागितले.

मोदी यांच्या सभेला मोठ्या संख्‍येने कार्यकर्त्यांना आणण्‍याचा विडा कवळेकर यांनी उचलला आहे. याबाबत विचारविनिमय करण्याच्‍या उद्देशाने कवळेकर यांनी कार्यकर्त्यांची व समर्थकांची बैठक घेऊन त्‍यांना मार्गदर्शन केले.

प्रत्येक प्रभागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते व समर्थकांना मोदींच्‍या सभेला आणण्याची जय्यत तयारी कवळेकर यांनी केलेली आहे.

बेतुल येथे 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भारतीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्‍घाटन सोहळ्यासाठी 6 रोजी बेतुल येथे येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मडगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्याचे नियोजन भाजपकडून करण्यात येत आहे. त्याविषयी प्राथमिक चर्चा पक्षाच्या गाभा समितीच्या बैठकीत आज झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT