Jetty TGA
गोवा

Cutbona Jetty: वापरात नसलेल्या बोटी तीन दिवसांत हटवा! कुटबण-मोबोरबाबतीत उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Cholera Cases at Cutbona Mobor: कुटबण व मोबोर जेटीवर जवळपास १०० डेंग्यू व कॉलराचे रुग्ण असल्याचे बोलले जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: कॉलरा व डेंग्यूच्या आजाराने कुटबण व मोबोर जेटीवरील मजुरांचे आरोग्य बिघडले आहे. काहीजण मृत्युमुखी पडले आहेत. तेथील परिस्थिती हालाकीची असल्याचे दिसून आल्याने गेल्या चार वर्षांतील ज्या वापरात नसलेल्या बोटी जेटीवर ठेवलेल्या आहेत त्या तीन दिवसांत साफ करण्याचा व हटविण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी दिला आहे.

उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली आमदार क्रुझ सिल्वा, आरोग्य केंद्राच्या डॉ. बेनोदीत डायस, बोट मालक विनय तारी, ‘गोवा कॅन’चे रोलांड मार्टिन्स, सावियो डिसिल्वा तसेच एफडीए, आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी कुटबण व मोबोर जेटीची पाहणी केली. कुटबण व मोबोर जेटीवर जवळपास १०० डेंग्यू व कॉलराचे रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. कुटबण जेटीवर चार मच्छीमार मजुरांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य खात्याच्या अधिकारी डॉ. बेनोदीत डायस यांनी सांगितले की, आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इथे डेंग्यूचे ९ रुग्ण आहेत, मलेरियाचा एकही नाही. आम्ही दोन हजार मजुरांची तपासणी केली आहे. अशाप्रकारचे आजार न होण्यासाठी स्वच्छता हा परिणामकारक उपाय आहे.

सावियो डिसिल्वा यांनी सांगितले की, मत्स्यव्यवसाय खात्याच्या दुर्लक्षामुळेच रोगराई वाढली आहे. बोट मालक विनय तारी म्हणाले की, येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आवश्‍यक माहिती गरजेची

‘गोवा कॅन’चे निमंत्रक रोलांड मार्टिन्स यांनी सांगितले की, वापरात न येणाऱ्या बोटी आणि मजुरांची माहिती ही गरजेची आहे. मात्र, त्याची काहीही नोंद नाही. स्वच्छतेसाठी स्थानिक पंचायतीला पावले उचलण्यास सांगितले आहे. प्राथमिक आरोग्य खाते तर बिनकामाचे आहे. ग्राहक संरक्षण कायद्याखाली आम्ही हे प्रकरण हाताळणार असून सर्व संबंधित एजन्सीना नोटिसा पाठविल्या जातील.

येथील साधनसुविधांचा वापर योग्यप्रकारे होत नसल्याचे दिसून आले आहे. शौचायले बंद आहेत. जी आहेत तिथे घाण झाली आहेत. नवीन जेटीचा वापर केला जात नाही. सुलभ शौचालयांमध्ये अनेक उणिवा दिसून आल्या आहेत. काहींना दिलेले परवाने जुनेच आहेत, त्यांचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
गणेश बर्वे, उपजिल्हाधिकारी
इथे सुमारे तीन हजार मच्छीमार मजूर आहेत; पण त्यांची व्यवस्थित नोंद नाही. गेल्या तीन वर्षांपासून काही बोटी विनावापर पडून आहेत. या बोटी मजूर रेस्ट हाऊस म्हणून वापरतात. मच्छीमार खाते या बोटमालकांकडून दंड म्हणून पाच हजार रुपये घेते. मात्र, या बोटी हलविण्याचा आदेश देत नाही. या बोटींमुळेच अशी परिस्थिती उद्भवली आहे. या बोटी तत्काळ हटविणे अत्यंत गरजेचे आहे.
क्रुझ सिल्वा, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT