Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पतीवरील रागातून उच्चशिक्षित मातेने घोटला चिमुकल्याचा गळा

Goa Crime News: सिकेरीतील हॉटेलात झालेल्‍या मुलाच्‍या खुनाचा अखेर उलगडा

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: उच्चशिक्षित पीएच.डी. धारक तथा बंगळुरूस्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीची सीईओ, कोट्यवधींची मालकीण सूचना सेठ हिने विभक्त नवऱ्यावरील रागातून पोटच्या चार वर्षीय मुलाला निर्दयीपणे ठार मारल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला.

एवढ्यावरच ती वैरिण माता थांबली नाही. बालकाचा मृतदेह सूटकेसमधून ती घेऊन जात होती. मात्र, या महिलेला पोलिसांनी कर्नाटकमध्ये शिताफीने पकडले. सूचनाला मंगळवारी कळंगुट पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, तिला 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सूचनाने प्रथमदर्शनी अतिशय थंड डोक्याने विचार करून ही हत्या केल्याचे दिसते.

तिने सिकेरीमधील गेस्ट हाऊसमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, तिने खरोखरच आत्महत्येचा प्रयत्न केला की, या प्रकरणातून इतरांचे लक्ष विचलित करण्यासाठी तिने डाव रचला, हे पोलिस तपासात पुढे उघड होईल.

गळा दाबल्याने मुलाचा मृत्यू

त्या मुलाची डॉ. कुमार यांनी चित्रदुर्ग येथे शवचिकित्सा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलाचा गळा दाबून मृत्यू झाला आहे. तिने मुलाला मारताना उशी वापरली असावी. मुलाच्या मृत्यूला ३६ तासांपेक्षा जास्त काळ झाला असून रक्ताची कमतरता किंवा दुखापतीच्या खुणा नाहीत.

संघर्षाचीही चिन्हे नाहीत. जेव्हा तुमचा गळा दाबला जातो, तेव्हा दबावामुळे शिरा बाहेर पडत नाहीत. मग ती छातीची नस असो किंवा चेहऱ्यावरील शिरा. शिरा फुगल्या, ही सर्व गळा दाबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शरीराला इजा होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT