Taxi meter Dainik Gomantak
गोवा

Taxi meter: ... अन्यथा मीटर परतीची सक्ती नाही : गुदिन्हो

ॲप बेस सेवा : आलेक्स रेजिनाल्ड यांच्या प्रश्‍नाला वाहतूक मंत्र्यांनी दिले उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

App Based Taxi Services: गोव्यात पर्यटकांना वाजवी दरात टॅक्सी सेवा मिळावी, या उद्देशाने सरकारने सर्व टुरिस्ट टॅक्सींना मीटर बसवले होते.

ॲप आधारित टॅक्सी सेवेच्या दिशेने सरकारकडून वाटचाल केली जात असली तरी टॅक्सीमध्ये बसवलेले मीटर परत करण्याची सक्ती नाही, असे लेखी उत्तर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिले.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी टॅक्सी मीटरसंदर्भात अतारांकित प्रश्‍न विचारला होता.

राज्यातील एकूण 2251 टॅक्सींना मीटर बसवले असून एका मीटरची किंमत 11 हजार 234 रुपये आहे. राज्य सरकारने यासाठी एकूण 2.48 कोटी रुपये खर्च केले आहेत. रेजिनाल्ड यांनी विधानसभेत यावर उपप्रश्‍न विचारले होते. त्यात किती टॅक्सींना मीटर बसवले,

एका मीटरची किंमत किती, मीटर बसवण्यासाठी आलेला एकूण खर्च आणि ॲप आधारित टॅक्सी सेवेत सामील होण्यासाठी इच्छुकांना मीटर परत करावे लागेल का? यासंदर्भात वाहतूकमंत्र्यांनी लेखी उत्तर दिल्यामुळे मीटरची समस्या निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅक्सीचालकांना भेडसावत होता प्रश्‍न

राज्य सरकारने 2018 साली गोवा माईल्स ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू केली होती. तर हल्लीच गोवा टॅक्सी ॲप सेवा सुरू केली आहे. त्यामुळे एवढी मोठी रक्कम खर्च करून बसवलेल्या मीटरचे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

ॲप आधारित टॅक्सी सेवेत प्रवासाचे दर आणि भाडे ॲपवरच दिसतात. त्यामुळे मीटरचे काय करायचे, असा प्रश्‍न ॲप सेवेत सामील होण्यास इच्छुक असलेल्या टॅक्सीचालकांपुढे निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT