Celebration of Konkani Cinema Day  Dainik Gomantak
गोवा

कोकणी 'सिनेमा' दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

कोकणीतील पहिला सिनेमा ‘मोगाचो आंवडो’ होता.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: 24 एप्रिल या कोकणी सिनेमा दिनानिमित्त रविवारी दाल्गादो कोकणी अकादमीने मडगावच्या रवीन्द्र भवनच्या कृष्ण कक्षात खास चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. ‘कोकणी सिनेमाची स्थित व भविष्य’ या विषयावर चर्चा होणार आहे. या चर्चा सत्रात आघाडीचे कोकणी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार भाग घेणार आहेत. यात जितेंद्र शिकेरकर, सुरज केरकर, आंद्रे तेक्सेरा यांचा समावेश आहे. कोकणीतील पहिला सिनेमा ‘मोगाचो आंवडो’ होता. या सिनेमाची निर्मिती व दिग्दर्शन आंतोनियो लॉरेन्स जेरी ब्रागांझा यानी केले होते. हा सिनेमा 24 एप्रिल 1950 या दिवशी प्रदर्शित झाला होता. आंतोनियो ब्रागांझा यांना कोकणी सिनेमाचा जनक मानले जाते. या कार्यक्रमाला निर्माता व कलाकार राजेश पेडणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT