Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: व्यावसायिकांना हटवण्याचे आदेश; विक्रेत्यांची आमदारांकडे कैफियत, म्हणाले, 'पालिकेने अधिकृत...

विक्रेते म्हणाले की, पालिकेने अधिकृत जागा देऊन व्यवसाय करण्याची संधी द्यावी

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Market म्हापसा येथील शकुंतलेच्या पुतळ्यासमोर म्हापसा बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ व्यवसाय करणाऱ्या काही विक्रेत्यांना तेथून हटविण्याचा आदेश पालिकेने दिला आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी या विक्रेत्यांनी पालिका कार्यालयात आमदार जोशुआ डिसोझा यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर कैफियत मांडली.

यावेळी विक्रेते म्हणाले की, गेल्या 40/50 वर्षांपासून आम्ही याठिकाणी व्यापार करतो. आमचे वाडवडीलही येथेच व्यापार करत होते. त्यामुळे आता आम्हाला दुसरीकडे हलवू नये.

जर आम्हाला येथून हटवल्यास आमच्याकडे उदरनिर्वाहाचे आणखी कोणतेही साधन नाही. त्यामुळे या प्रश्‍नावर तातडीने तोडगा काढावा.

यावेळी सुरेश नाईक, मुकुंद मातोंडकर, संतोष बामणे, श्रीमती पोवळेकर यांच्यासह सुमारे बारा विक्रेते डिसोझा यांना भेटले. डिसोझा यांच्यासोबत नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, मार्केट समितीचे अध्यक्ष आशीर्वाद उर्फ परेश खोर्जुवेकर, नगरसेवक सुशांत हरमलकर उपस्थित होते.

आमदार डिसोझा म्हणाले की, या जागेतून ये-जा करण्यास लोकांना त्रास होतो. त्यामुळे ही जागा मोकळी ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मार्केट समितीचे अध्यक्ष खोर्जुवेकर यांनी या विक्रेत्यांशी चर्चा करून त्यांचा सहानुभूतीने विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली.

पालिकेने अधिकृत जागा द्यावी

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विक्रेते म्हणाले की, म्हापसा सार्वजनिक गणपती पूजतात, त्या ठिकाणी पूर्वी 28 विक्रेते व्यवसाय करत होते. परंतु यातील 20 विक्रेते इतर ठिकाणी जाऊन व्यवसाय करत आहेत.

शिल्लक आठ विक्रेत्यांपैकी दोघे मरण पावले. आता सहा विक्रेत्यांना पालिकेने अधिकृत जागा देऊन व्यवसाय करण्याची संधी द्यावी. यावेळी संतोष बामणे, मुकुंद मातोंडकर, सुरेश नाईक, श्रीमती पोवळेकर यांनी कैफियत मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT